संबंधितांच्या नातेवाईकांना त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि. 24 फेब्रुवारी: सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून रशिया या देशाने युद्ध घोषित केले आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक अडकले असल्यास संबंधित नागरिकांच्या नातेवाईकांनी तात्काळ जवळच्या तहसील कार्यालयात संपर्क करून कळवावे. जेणेकरून अडकलेल्या नागरिकांना सुखरूपपणे परत सुरक्षित ठिकाणी आणण्याबाबत कार्यवाही करता येईल.
युक्रेनमध्ये अडकलेल्या संबंधितांच्या नातेवाईकांनी त्वरित जवळच्या तहसील कार्यालयात किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयातील 07172-251597 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 7666641447 या मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी कळविले आहे.
Administration operates toll-free numbers for citizens stranded in Ukraine.
Appeal to contact relatives immediately.