12 ते 14 वयोगटातील मुलामुलींना चंद्रपुरात 17 मार्चपासून मिळणार कोरोना लस Chandrapur between the ages of 12 and 14 will get the corona vaccine in Chandrapur from Thursday

12 ते 14 वयोगटातील मुलामुलींना चंद्रपुरात 17 मार्चपासून मिळणार कोरोना लस

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर: चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मार्फतीने चंद्रपूर शहरातील 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला गुरुवार दिनांक 17 मार्च पासून प्रारंभ होत आहे.  शहरातील  एनयुएलएम ऑफिस, ज्युबिली हायस्कूलसमोरील केंद्रांवर प्रायोगिक तत्त्वावर सकाळी 10 वाजल्यापासून लसीकरण सुरु होणार आहे.. लाभार्थ्‍यांना कोर्बेव्हॅक्स या लसीचे 2 डोस 28 दिवसांच्‍या अंतराने देण्‍यात येणार आहेत. पुढील काही दिवसात शालेय परीक्षा होणार असून, त्यापूर्वीच आपल्या बालकांचे आरोग्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ही लस घ्यावी, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार यांनी केले आहे.

Children between the ages of 12 and 14 will get the corona vaccine in Chandrapur from Thursday.