धक्कादायक घटना: बनावटी आयकर रिटर्न तयार करून स्टेट बँक ऑफ इंडीया मुख्य शाखा चंद्रपुरला लावला 14 कोटी 26 लाख चा चुना Shocking Incident: Fake Income Tax Return Prepared State Bank of India Main Branch at Chandrapur Lime of Rs 14 crore 26 Lakh

धक्कादायक घटना: बनावटी आयकर रिटर्न तयार करून स्टेट बँक ऑफ इंडीया मुख्य शाखा चंद्रपुरला लावला 14 कोटी 26 लाख चा चुना

चंद्रपुर : पोलीस स्टेशन रामनगर चंद्रपुर येथे दिनांक 08/03/2020 रोजी फिर्यादी श्री संजोग अरुणकुमार भागवतकर, क्षेत्रीय प्रबंधक, SBI स्टेट बँक ऑफ इंडीया मुख्य शाखा कार्यालय चंद्रपुर यांचे लेखी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन रामनगर चंद्रपुर येथे अप क. 267 / 2020 कलम 420, 406, 409, 417, 420, 465, 466, 467, 468, 471, 120 (ब)भा.द.वीचा दाखल केला होता. त्यामध्ये चंद्रपुर जिल्हयातील स्टेट बँक ऑफ इंडीया SBI कडे 44 कर्ज प्रकरणात कर्जधारकांनी बनावट आयकर रिटर्न (Income Tax Return) तयार करून एजंट मार्फत गृह कर्जासाठी अर्ज केले. सदर प्रकरणी कर्ज प्ररकणाची नियमानुसार पडताळणी न झाल्याने मुल्याकनापेक्षा जास्तीच्या रक्कमेचे गृहकर्जामध्ये वाटप झाले. कर्ज वाटपानंतरच्या तपासणीमध्ये बँकेंच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना बॅकेंची एकुण 14,26,61,700/ रू. चे फसवणुक (FRAUD) झाल्याची बाब लक्षात आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला तकार दाखल केली होती, त्यानुसार प्रकरणी गुन्हा नोंद झालेला आहे.

सदर गुन्हयाचा तपास प्रकरण कर्जधारकांनी बनावट आयकर रिटर्न तयार करून बँकेस सादर केल्याचे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यात एकुण 11 कर्जधारक एजंट 01 व बॅकेंचे 03 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे.
Shocking Incident: Fake Income Tax Return Prepared State Bank of India Main Branch at Chandrapur Lime of Rs 14 crore 26 Lakh