पोंभुर्णा शहर विकासासंदर्भात रोल मॉडेल ठरावे यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करणार – आ. सुधीर मुनगंटीवार
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर सभेत मानले पोंभुर्णा वासियांचे आभार
नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींनी स्विकारला कार्यभार
#Loktantrakiawaaz
चंद्रपुर (पोंभुर्णा), 13 मार्च: पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रात केलेली विकासाची अभूतपूर्व कामे व राबविलेल्या लोककल्याणकारी योजना व उपक्रम यांच्या माध्यमातुन पोंभुर्णा नगर पंचायतीवर पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकला आहे. आपण जो विश्वास व प्रेम भारतीय जनता पार्टीप्रती व्यक्त केले त्या विश्वासाला जागत आम्ही या शहराचा वेगाने विकास करू. हे शहर विकासासंदर्भात रोल मॉडेल ठरावे यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करणार अशी ग्वाही विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा वासियांना दिली.
पोंभुर्णा नगर पंचायतीच्या नवनियुक्त अध्यक्षा सौ. सुलभा पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार व त्यांच्या सहका-यांनी दिनांक १२ मार्च २०२२ रोजी पदभार स्विकारला. त्यानिमीत्ताने आयोजित जाहीर सभेत आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा वासियांचे जाहीर आभार मानले. दिवंगत भाजपा नेते गजानन गोरंटीवार यांचे स्मरण करत ते पुढे म्हणाले, पोंभुर्णा नगर पंचायतीची इमारत बांधण्याबाबत गजानन गोरंटीवार यांनी आग्रह केला व पाठपुरावा देखील केला. या शहरातील नागरिकांना सर्व मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी आम्ही सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातुन अभ्यास करणा-या सिडाम नामक विद्यार्थी पीएसआय ची परिक्षा उत्तीर्ण झाला. आम्ही कायम विकासाचे राजकारण केले. विकासाची मोठी मालिका या शहरात आम्ही तयार केली. चिंतामणी महाविद्यालयाजवळ मोठे प्रवेशद्वार तयार करण्यासाठी निधी मंजूर केला, वेळवा रस्त्यासाठी सुध्दा निधी उपलब्ध केला. अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात अनेक योजना राबविता आल्या याचा मनापासून आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती, पुतळा उभारायचा आहे ही मागणी सुध्दा लवकरच पूर्ण करणार असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.
पोंभुर्णा शहरात बस स्थानक उभारणे तसेच एमआयडीसी कार्यान्वीत करणे या दोन प्रमुख मागण्या अद्याप प्रत्यक्षात साकार झाल्या नाहीत, मात्र सर्वशक्तीनिशी प्रयत्न करून या दोन्ही मागण्या आपण लवकरच पूर्ण करू. २३ मार्च रोजी नेत्र चिकीत्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा व उपाध्यक्षांसह सभापती महिला व बालकल्याण आकाशी गेडाम, उपसभापती महिला व बालकल्याण उषा गोरंतवार, आरोग्य व पाणी पुरवठा सभापती नंदाताई कोटरंगे, शिक्षण सभापती रोहिणी ढोले यांनी देखील कार्यभार स्विकारला. यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अलका आत्राम, भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय गजपुरे, जि.प. सदस्य राहूल संतोषवार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, भाजपा पोंभुर्णा शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे, महासचिव गजानन मडपूवार, नगरसेविका श्वेता वनकर, शारदा गुरनुले, महेश रणदिवे, लक्ष्मण कोडापे, दर्शन गोरंटीवार, जमनादास गोवर्धन, नंदकिशोर तुम्मुलवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अलका आत्राम यांच्या जन्मदिनानिमीत्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
The city of Pombhurna will make every effort to be a role model for development- MLA Sudhir Mungantiwar
Come on MLA Sudhir Mungantiwar thanked the people of Pombhurna in a public meeting.
Newly elected President, vice president and chairpersons accepted the duties. Chandrapur