ग्रीन हायड्रोजन गाडी केव्हा लॉन्च करणार? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितली तारीख, भंडारा, गोंदियात मॅग्निजचे साठे तर चंद्रपुर गडचिरोली मध्ये स्टील इंडस्ट्रीची मोठी शक्यता Green Hydrogen launch? According to Union Minister Nitin Gadkari

ग्रीन हायड्रोजन गाडी केव्हा लॉन्च करणार? 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितली तारीख

टुरिझमला होणार फायदा

#Loktantrakiawaaz
नागपूर 06 मार्च : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) म्हणाले, पाण्यातून ग्रीन हायड्रोजन निर्माण केलं जाईल. त्यात विदर्भ हा सेंटर असेल. टुरिझम वाढविण्यासाठी आता सफारीसाठी इलेक्ट्रिक गाड्या (Electric Trains for Safari) वापरल्या जातील. त्यामुळे प्रदूषण आणि आवाज होणार नाही. त्यामुळे गाड्या वाढतील. त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था वाढेल. त्यातून रोजगारसुद्धा निर्मिती होईल. संपूर्ण विदर्भात औद्योगिक विकासाच चित्र तयार होण्यासाठी हा औद्योगिक महोत्सव घेतला जात आहे. त्याचा मोठा फायदा होईल, असंही गडकरी यांनी सांगितलं. नितीन गडकरींचा आणखी एक नवा प्रयोग करणार आहेत. 16 मार्च रोजी ते आता ग्रीन हायड्रोजन गाडी लॉन्च (Green hydrogen car launch) करणार आहेत. याची माहिती त्यांनी आज नागपुरात दिली.

➡️ रोजगार उपलब्ध झाला पाहिजे
विदर्भाचा विकास आमचा अजेंडा आहे. विदर्भासोबत महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासोबत देशाचा विकास होईल. हायट्रोजनवर जगात रेल्वे चालली. काही देशात कार चालत आहे. आता देशातील हायट्रोजनवर पहिली कार दिल्लीत चालणार आहे. विजेच्या बास्केटमध्ये 33 टक्के सोलर आहे. आता प्रत्येक उद्योगाने आपलं सोलर लावायचं. पण त्याला राज्यसरकारकडून पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य मिळाले नाही. आता 38 टक्के सोलरवर आलं. कोणाचा रोजगार जाता कामा नये आणि सुधारही झाला पाहिजे, असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

➡️ भंडारा, गोंदियात मॅग्निजचे साठे तर चंद्रपुर गडचिरोली मध्ये स्टील इंडस्ट्रीची मोठी शक्यता
रोजगार वाढविण्यासाठी पुढील दहा वर्षांचा विचार करावा लागेल. त्यानुसार योजना बनवाव्या लागतील. त्यामधून उद्योग येतील आणि रोजगार निर्मिती होईल. महाराष्ट्रातील 75 टक्के मिनरल्स विदर्भात आहेत. 80 टक्के जंगल विदर्भात आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात स्टील इंडस्ट्रीची मोठी शक्यता आहे. देशात 55 लाख टन मॅग्निजची गरज आहे. पण, देशात फक्त 25 लाख टन मॅग्निज तयार होतो. त्यामुळं 30 लाख टन मॅग्निज परदेशातून आयात करावा लागतो. भंडारा, गोंदिया, बालाघाटमध्ये मॅग्निज उपलब्ध आहे. अॅल्युमिनीअयमवर संशोधन करणारे संस्था नागपूरमध्ये असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

(When will Green Hydrogen launch?  According to Union Minister Nitin Gadkari, there are huge reserves of manganese in Bhandara, Gondia and Steel Industry in Chandrapur Gadchiroli.)