चंद्रपुर, 28 मार्च : लोकमान्य टिळक विद्यालय मित्र परिवार, चंद्रपूर (लो.टी.वि. बॅच २०००) तर्फे गोकुल गली, मेन रोड, चंद्रपुर येथे चंद्रपूरच्या नागरिकांसाठी पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. उन्हाळ्याची सुरुवात झाल्यामुळे उष्णतेचे प्रमाण सुद्धा वाढले आहे आणि येवढ्या उन्हेत चंद्रपूरच्या नागरिकांच्या सोईसाठी पाणपोईची स्थापना करण्यात आली आहे.
आजच्या या पाणपोईचे उद्घाटन लोकमान्य टिळक विद्यालयाचे सन्माननीय शिक्षक श्री.राजेंद्र गांधी यांच्या तर्फे करण्यात आले. आजच्या या कार्यक्रमात विशेष उपस्थिती शिक्षातज्ञ गोंडवाना विद्यापीठाचे पूर्व डीन आदरणीय श्री.जुगलकिशोर सोमाणी व समाजसेवी श्री.शामलाल बजाज यांची होती.
मागे चार वर्षा पहिले सुद्धा मित्र परिवार तर्फे निरंतर दोन वर्ष (वर्ष २०१८ व वर्ष २०१९ मधे) पाणपोईचे आयोजन केले होते. परंतु, मागील दोन वर्ष कोरोना व लॉकडाऊनचे निर्देश असल्यामुळे पाणपोई सुरू होऊ शकली नाही. पहिले सुद्धा लोकमान्य टिळक विद्यालय मित्र परिवार, चंद्रपूर तर्फे वृक्षारोपण, रक्तदान, सेफ्टी मास्क वितरण, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था, फळ व ताक वितरण व ईतर सामाजिक उपक्रम घेण्यात आले आहे.
आजच्या या कार्यक्रमात अमित भारद्वाज, धीरज देठे, अभिनव बांगडे, दिनेश माखिजी, डॉ.यशोधन वाडेकर, गौरव यादव, पंकज नागरकर, सुमेध खनके, मयूर हरणे, हर्षल टिकले, अमर मुल्लेवार, अतुल आंबोरकर, रुपेश भारद्वाज, रिषभ भारद्वाज, राजू श्रीगडीवार, सुधीर बजाज, मंगेश नवघरे, पंकज झोडे, प्रफुल ठाकरे, जयंत निमगडे व ॲड.आशिष मुंधडा व इतर पूर्व विद्यार्थींनी सहकार्य केले.
Inauguration of Panpoi by Lokmanya Tilak Vidyalaya Mitra Parivar, Chandrapur.