जल संत्याग्रहाला मिळत आहे चंद्रपूरकरांची साथ Jal Santyagraha is getting the support of Chandrapurkar

जल संत्याग्रहाला मिळत आहे चंद्रपूरकरांची साथ

चंद्रपुर, 17 मार्च: जनतेला पुरा पासून वाचविण्यासाठी, पाणी टंचाई भासू नये, जमिनीत पाणी झिरपून विहीर, बोरिंग मध्ये भरपूर मात्रा मध्ये पाणी राहावे यासाठी इरई नदीचे खोलीकारण - रुंदीकरण व 6 पेक्षा जास्त बंधारे बांधण्याच्या सन 2006 पासूनच्या जनहिताच्या या मागणीला घेऊन मंगळवार दि. 22 मार्च 2022 रोजी प्रस्तावित इरई बचाव जनआंदोलनाच्या इरई कन्यांच्या जलसंत्याग्रहा ला चंद्रपूरातील अनेक मंडळ, संस्था, संघटना,  पहिल्याच दिवशी मोठया संख्येने 
सामील होण्यासाठी पुढे आल्या आहेत यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, जन विकास सेना, सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट, चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ जटपुरा, युवक मंडळ गंजवार्ड, बालवीर गणेश मंडळ पंजाब बँके जवळ, बालवीर गणेश मंडळ नगीनाबाग, विठाई संस्था, वृक्षाई पर्यावरण संस्था आहे. या जलसंत्याग्रहाला चंद्रपूरातील सर्वच नागरिक, सामाजिक, धार्मिक, महिला गट, कामगार-कर्मचारी, युवक -युवती, गणेश-दुर्गा-शारदा मंडळ इत्यादी मंडळानी मोठया संख्येने सहभागी होण्यासाठी आपली नावे whatsapp व्हाट्सअँप क्र.8180051555 वर "इरई बचाव जनआंदोलनाच्या जलसत्याग्रहात आम्ही मोठया संख्येने सहभागी होऊच "हे लिहून पाठविण्याची व आपल्या सामान्य नागरिकांच्या जलसंत्याग्रहाला शांततेने इरई नदीच्या कल्याणा साठी सफल करण्याची विनंती वृक्षाई चे संस्थापक व इरई बचाव जनआंदोलनाचे संयोजक कुशाब कायरकर, वरिष्ठ पत्रकार प्रकाश चांभारे, इरई कन्या गीता अत्रे, प्रीती लांडे, विभा टोंगे सह सर्व इरई कन्या-पुत्र व वरील सर्व सहभागी संस्थांनी केली आहे.
Jal Santyagraha is getting the support of Chandrapurkar.

खबर और अपडेट के लिए loktantrakiawaaz.co.in पर क्लिक करे.