Maharashtra Government DA : महाराष्ट्र सरकारचं मोठा निर्णय, महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला, राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांना निर्णयाचा थेट लाभ मिळणार Maharashtra State Employees

Maharashtra Government DA : महाराष्ट्र सरकारचं मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला

राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांना निर्णयाचा थेट लाभ मिळणार 

मुंबई, 30 मार्च : महाराष्ट्र विकास आघाडी (MVA) सरकारनं राज्य सराकरी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ केली आहे. केंद्राप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रानं तीन टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्याता निर्णय आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. त्यानंतर आता राज्य सरकारनंही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. वाढीव महागाई भत्त्यामुळे आता महाराष्ट्र (Maharashtra) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 31 टक्के इतका डीए DA मिळणार आहे. 21 जुलै 2021 पासून नवा डीए कर्मचाऱ्यांना लागू होणार असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातही थेट वाढ होणार आहे. राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं केलेल्या महागाई भत्त्यातील वाढीनुसार आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 34 टक्के इतका डीए मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि केंद्रातील सरकारी कर्मचारी या दोघांना 2022 पासून नव्या महागाई भत्त्याप्रमाणे वेतन मिळणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं जारी केलेल्या शासन निर्णयानुसार 1 जुलै 2021 पासून राज्य कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्तावाढ देण्यात येणार आहे. मार्च 2022 च्या पगारासोबत फरकाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

➡️ केन्द्र सरकारच्या पावलावर पाऊल
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात कॅबिनेटनं केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य सरकारनं देखील महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला आहे. त्या प्रमाणं राज्य सरकारच्या कर्मचारियांचा डीए DA देखील वाढवण्यात आला आहे.

➡️ महाराष्ट्र सरकारचनं जारी केलेले शासन निर्णय पाहा

Government of Maharashtra DA: Government of Maharashtra follows in the footsteps of the Center.
Maharashtra State Employees' dearness allowance increased.
As many as 17 lakh employees in the state will directly benefit from the decision.