चंद्रपूरातील तरूणीच्‍या संशयास्‍पद मृत्‍युची सखोल चौकशी करावी – आ. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी, शासनाने त्‍वरीत निवेदन करण्‍याचे पिठासीन अधिका-यांचे निर्देश Suspicious death of a young woman in Chandrapur should be thoroughly investigated - Demand of MLA Sudhir Mungantiwar in the Legislative Assembly Instructions of the presiding officer for the government to make a statement immediately

चंद्रपूरातील तरूणीच्‍या संशयास्‍पद मृत्‍युची सखोल चौकशी करावी – आ. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी

शासनाने त्‍वरीत निवेदन करण्‍याचे पिठासीन अधिका-यांचे निर्देश

#Loktantrakiawaaz
मुंबई, 21 मार्च : चंद्रपूर शहरातील शितल मेहता या तरूणीच्‍या संशयास्‍पद मृत्‍युची सखोल चौकशी करण्‍यात यावी व चौकशीच्‍या निष्‍कर्षाच्‍या अनुषंगाने दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभागृहात केली. हा विषय अतिशय गंभीर असून महिलांच्‍या सुरक्षीततेशी निगडीत असल्‍यामुळे शासनाने त्‍वरीत याबाबत निवेदन करावे, असे निर्देश पिठासीन अधिका-यांनी दिले.

दिनांक २१ मार्च २०२२ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वरील घटनेच्‍या अनुषंगाने विधानसभेत स्‍थगन प्रस्‍तावाची सुचना दाखल केली होती. सदर तरूणीचा अपघात नसून घातपाताचा प्रकार असल्‍याचा आरोप तिच्‍या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्‍ये विशेषतः महिलांमध्‍ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुव्‍यवस्‍थेसमोर प्रश्‍नचिन्‍ह उभे राहिले असल्‍याची भावना आ. मुनगंटीवार यांनी  व्‍यक्‍त केली.
Chandrapur should be thoroughly investigated - Demand of MLA Sudhir Mungantiwar in the Legislative Assembly Instructions of the presiding officer for the government to make a statement immediately.

खबर और अपडेट के लिए loktantrakiawaaz.co.in क्लिक करे.