चंद्रपुर 144 कलम लागू Section 144 applicable in Chandrapur examination sub-center area

चंद्रपुर परीक्षा उपकेंद्र परिसरात 144 कलम लागू

महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा- 2021

 या परीक्षा उपकेंद्रांना लागू राहतील आदेश

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर दि. 1 एप्रिल: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील (MPSC) महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा-2021, चंद्रपूर मुख्यालयाच्या chandrapur ठिकाणी दि. 3 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान एकुण 20 उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा उपकेंद्राच्या ठिकाणी सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे.

परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसर व क्षेत्रातंर्गत परीक्षार्थी व्यतिरिक्त दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाहीत. सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नियमित व रोजच्या वाहतुकी व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एसटीडी बूथ, पेजर, मोबाईल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणत्याही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील.

➡️ या परीक्षा उपकेंद्रांना लागू राहतील आदेश:

🔹विद्या विहार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, 
तुकुम, 
🔹चंद्रपूर, रफी अहमद किदवाई हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, घुटकाळा वार्ड, 
🔹सरदार पटेल महाविद्यालय गंजवार्ड, 
🔹सेंट मायकेल इंग्लिश स्कूल नगीनाबाग, 
🔹श्री. साई पॉलीटेक्निक नागपूर रोड, 
🔹नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, 🔹मुरलीधर बागला कॉन्व्हेंट हायस्कूल बाबुपेठ, 
🔹जुबली हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर, 🔹लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, 
🔹मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आर्ट, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय तुकुम,
🔹एफ.ई.एस. गर्ल्स कॉलेज चंद्रपूर, 
🔹हिंदी सिटी उच्च माध्यमिक शाळा आझाद गार्डनजवळ चंद्रपूर, 
🔹लोकमान्य टिळक कन्या विद्यालय, 
🔹एफ.ई.एस गर्ल्स हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, 
🔹डॉ.आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चंद्रपूर, 
🔹चांदा पब्लिक स्कूल, 
🔹बि.जे.एम. कार्मल ॲकॅडमी तुकुम, 
🔹राजीव गांधी महाविद्यालय मुल रोड, तसेच 
🔹भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय मुल रोड, 
चंद्रपूर या परीक्षा उपकेंद्रांना सदर आदेश लागू राहतील.

सदर आदेश चंद्रपूर मुख्यालयातील चंद्रपुर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून mpsc महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा-2021 मधील परीक्षा उपकेंद्रांवर दि. 3 एप्रिल 2022 रोजीचे सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अंमलात राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती व इसम प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.
Section 144 applicable in Chandrapur examination sub-center area.