Breaking News: शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या Shiv Sena MLA Mangesh Kudalkar's wife commits suicide

Breaking News: शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या

#Loktantrakiawaaz
मुंबई, 17 अप्रैल  : शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांची पत्नीने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रजनी कुडाळकर (Rajani Kudalkar) (वय- 42 वर्ष) असे त्यांचे नाव असून कुर्ला नेहरु नगर येथील राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु करण्यात आला आहे. रजनी कुडाळकर यांचं पार्थिव शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळतेय. (Shiv Sena MLA Mangesh Kudalkar’s wife commits suicide by strangulation)
मंगेश कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. कुडाळकर हे कुटुंबासह कुर्ल्यातील नेहरु नगर परिसरात वास्तव्यास आहेत. रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रजनी यांनी राहत्या घरात गळफास घेतला. 
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रजनी यांचा मृतदेह ताब्यात घेत घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. रजनी यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Shiv Sena MLA Mangesh Kudalkar's wife commits suicide.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.