महागाई विरोधात चंद्रपुर कांग्रेस चे धरणे आंदोलन Chandrapur Congress's agitation against inflation


महागाई विरोधात चंद्रपुर कांग्रेस चे धरणे आंदोलन

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 03 अप्रैल: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या congress वतीने देशात महागाई वाढण्यात जबाबदार असलेल्या केंद्र सरकारविरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या धरणे आंदोलनात उद्या सोमवार 4 अप्रैल 2022 रोजी दुपारी 4:00 वाजता, स्थळ जटपुरा गेट महात्मा गांधी पुतळा परिसर, चंद्रपूर येथे होणार आहे.

या धरणे आंदोलनात सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, अशी विनंती रितेश (रामू) तिवारी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर यांनी केली आहे.
Chandrapur Congress's agitation against inflation.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.