मेहनत, त्याग आणि प्रखर राष्ट्रवाद असे अनेक पैलू त्यांच्या अमित शाह व्यक्तिमत्वाचे : देवेन्द्र फडणवीस
#Loktantrakiawaaz
मुंबई, 27 अप्रैल: 'अमित शाह आणि भाजपाची वाटचाल' या अनुवादीत मराठी पुस्तकाचे प्रकाशन.
या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मंगल प्रभात लोढा, आशीष शेलार, अतुल भातखळकर, उदय निरगुडकर, रमेश पतंगे, अनिर्बान गांगुली, शिवानंद द्विवेदी, डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर उपस्थित होते.
🔹 या पुस्तकातून मा. अमित शाह यांचा संपूर्ण जीवनपट साकारण्यात आला आहे.
भाजपची वाटचाल आणि त्यात मा. अमित शाह पर्व याचा संपूर्ण मागोवा त्यात आला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा, सोपे करून सांगण्याचे काम लेखकांनी केले आहे.
🔹 मा. अमित शाह यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी आली तेव्हा त्यांनी अतिशय बारकाईने त्या राज्याचा अभ्यास केला. सर्व निवडणुका लढण्याचा त्यांचा निर्णय हा उत्तर प्रदेशातील राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. 80 पैकी 73 जागा जिंकण्याचा विक्रम त्यातून साकारला.
🔹 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचा अतिशय सखोल अभ्यास मा. अमित शाह यांनी केला आहे. अनेक तास ते यावर बोलू शकतात. त्यावर एक पुस्तक त्यांनी लिहिले आहे. देश-विदेशातून त्यासाठी त्यांनी संदर्भ गोळा केले. या पुस्तकाचे प्रकाशन अजून व्हायचे आहे.
🔹 कुटुंब वत्सल आणि संवेदनशील असे मा. अमित शाह यांचे व्यक्तिमत्त्व. आपल्या नातीशी दिवसभरातील व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ते दररोज बोलत असतात.
🔹 मा.अमित शाह यांची निर्णय क्षमता अतिशय मोठी आहे. स्वतः दौरे करून अभ्यास करायचा आणि निर्णय घ्यायचा, हे त्यांचे वैशिष्ट्य.
🔹 काश्मिरच्या 370 चा निर्णय शक्य करून दाखविला. भाषण नाही तर कृतीत आणून दाखविणारे फार कमी नेते आहेत. त्यातील मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. अमित शाह हे आपले नेते आहेत.
🔹 आजकाल 'गदाधारी' हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जातात. पण रोज सकाळी टीव्ही पाहिला की ते 'गधाधारी' दिसते.
🔹मेहनत, त्याग आणि प्रखर राष्ट्रवाद असे अनेक पैलू त्यांच्या अमित शाह व्यक्तिमत्वाचे आहेत.
Hard work, sacrifice and intense nationalism are many aspects of his Amit Shah personality: Devendra Fadnavis.
बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.