#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 19 अप्रैल: सिंदेवाही तालुक्यातील सरडपार चक (Saradpar Chak) येथील 70 वर्षीय माणिक बुध्दा नन्नावरे (Manik Buddha Nannaware) हे अंगणात झोपले होते. त्याच दरम्यान बिबट्याने (leopard) हल्ला केला. या हल्ल्यात नन्नावरे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पंचनामा सुरू आहे. उर्मी होते म्हणून ग्रामीण भागात काही लोकं अंगणात झोपतात. चंद्रपुरात (Chandrapur) अंगणात झोपलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला बिबट्याने रात्री उचलून नेले. त्यामुळं सरडपार चक गाव परिसरात बिबट्याची दहशत पुन्हा निर्माण झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथे दोघांना बिबट्याने उचललं होतं. या घटनेचा अद्याप विसर झालेला नसताना सिंदेवाही तालुक्यात घडलेल्या घटनेमुळे गावकरी धास्तावले आहेत. वन्यप्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. आता आम्ही घरीही अंगणात झोपायचे नाही काय, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. वनविभागाचे अधिकारी यावर काही बोलायला तयार नाहीत. नागरिकांनी काळजी घ्यावी, एवढच त्यांचं म्हणण आहे.
Incident in Sindevahi taluka: A person sleeping in the yard was picked up by a leopard.
बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.