सकल जैन समाज चंद्रपुर तर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात भक्तिमय कार्यक्रम Organizing various programs on the occasion of Bhagwan Mahavir Janmakalyanak Mahotsav on behalf of Sakal Jain Samaj Chandrapur Devotional program at Priyadarshini Indira Gandhi Hall

सकल जैन समाज चंद्रपुर तर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात भक्तिमय कार्यक्रम

चंद्रपुर, 14 अप्रैल: आज दिनांक 14 एप्रिल रोजी जगाला अहिंसेचा संदेश देऊन शांतीचा, बंधुभावाचा तसेच दयेचा मार्ग दाखविणाऱ्या जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा 2621 वा जन्म कल्याणक महोत्सव चंद्रपूर येथे दरवर्षी प्रमाणे साजरा करण्यात येणार असुन ह्याप्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जन्म कल्याणकत्सवाची सुरुवात सकाळी 7 वाजता पदयात्रेने होणार असून त्यांनातर् महाआरती करण्यात येईल. सकाळी 8 वाजता शहरातील विविध मार्गांवरून भगवान महावीर ह्यांची अहिंसा रथयात्रा, स्कूटर, कार, यात्रा जैन स्थानक भवन, पठाणपुरा रोड वरून निघून सराफा लाईन जैन मंदिर, वरोरा नाका भगवान महावीर स्तम्ब, दादावाडी नागपुर रोड, चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, अरिहंत नगर, तुकुम, श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, विवेक नगर, मूल रोड मार्गे सराफा लाईन मधील जैन मंदिर येथे पोहचेल व अहिंसा रथयात्रा रैली चे समारोप होईल.

 श्री वर्धमान स्थानकवासी जैन मित्र मंडल तर्फे सरकारी दवाखाना, वृध्दाश्रम येथे दुपारी फळ वितरण करण्यात येणार असुन सकाळी 11 ते 4 दरम्यान जैन भवन येथे शांतीनाथ सेवा मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री जिनदत्त सूरी जैन मंडळ, जैन युथ क्लब ह्यांच्या तर्फे जैन मंदिर सराफा लाईन परिसरात शीतल पेय वितरित करण्यात येणार आहे.
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त सायंकाळी 7 ते 10 पर्यंत प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात रायपूर येथील सुप्रसिद्ध भजन गायक अंकित लोढा, ह्यांच्या सुमधुर भक्तिमय आवाजात महावीरमय भक्ती संध्या आयोजित करण्यात आली असून सर्वांनी ह्या भक्तिमय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. सकल जैन समाज चंद्रपुर चे अध्यक्ष माजी खासदार नरेशबाबू पुगलिया, श्री जैन श्र्वेतांबर मूर्ती पूजक संघचे अध्यक्ष निर्दोष पुगलीया, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघचे अध्यक्ष योगेश कुमार भंडारी, श्री दिगंबर जैन मंडल चे अध्यक्ष डॉ. महावीर सोइतकर, श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर (विवेकनगर) चे अध्यक्ष, सुभाष जैन, श्री चंद्रप्रभु जैन श्वेतांबर (दादावाडी) चे अध्यक्ष, राज पुगलीया ह्यांच्या मार्गदर्शनात समस्त जैन समाजाने आयोजित केलेल्या भगवान महावीर ह्यांच्या 2621 व्या जन्म कल्याणक महोत्सवात शहरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Organizing various programs on the occasion of Bhagwan Mahavir Janmakalyanak Mahotsav on behalf of Sakal Jain Samaj Chandrapur.
Devotional program at Priyadarshini Indira Gandhi Hall.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.