तत्व व राष्ट्रनिष्ठेतून बलशाली पक्ष उभा केला , भाजपा स्थापनादिनी हंसराज अहीर यांचे प्रतिपादन Statement of Hansraj Ahir on the founding day of BJP

तत्व व राष्ट्रनिष्ठेतून बलशाली पक्ष उभा केला

भाजपा स्थापनादिनी हंसराज अहीर यांचे प्रतिपादन

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर - राष्ट्रोध्दाराचे ध्येय घेवून 42 वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. सेवा, समर्पण, राष्ट्रभक्ती व समाजातील शेवटच्या घटकांचा उध्दार या विचारधारेला अनुसरून सुरू झालेला हा प्रवास आज सत्तांतराच्या दिशेने वाटचाल करतो आहे. चार दशकांच्या या वाटचालीत अनेक महनीय नेतृत्वाचे, ज्येष्ठ नेते, असंख्य कार्यकत्र्यांचे बहुमुल्य योगदान लाभले असून पक्षाचा हा उज्ज्वल प्रवास सदैव वेगवान राहण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी तत्वांशी समझौता केला नाही, राष्ट्रचिंतन, प्रखर राष्ट्रभक्तीतून राष्ट्रभक्त कार्यकर्ते घडविले पक्ष मजबुत, स्थिर उभा केला. या अद्वितीय कार्यात नेतृत्व व सर्व कार्यकत्र्यांचे फार मोठे श्रम व योगदान आहे असे प्रतिपादन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी भाजपा स्थापना दिन वर्धापन सोहळ्यानिमित्त केले.
भाजपा जनसंपर्क कार्यालय चंद्रपूर व भद्रावती येथील कार्यालयात भारत माता, डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी व पंडित दिनदया उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन करून हंसराज अहीर यांनी पक्ष स्थापनादिनी भाजपाचा ध्वज फडकवून हा वर्धापन दिवस साजरा केला. अनेकांच्या परिश्रमातून राजकीय क्षीतीजावर भक्कमपणे उभा असलेला हा पक्ष सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणुन आज उदयास आला आहे. आपणाला अजुनही फार मोठी झेप घ्यायची आहे असेही अहीर यांनी यावेळी सांगीतले.
या कार्यक्रमानिमित्त उपस्थित पदाधिकाऱ्यांना मिठाई भरवून स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Statement of Hansraj Ahir on the founding day of BJP