शिवसेनेला मोठा धक्का : आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन Big blow to Shiv Sena: MLA Ramesh Latke dies of heart attack

शिवसेनेला मोठा धक्का : आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

#Loktantrakiawaaz
मुंबई, 12 मे: Mumbai Shivena MLA Ramesh Latke Passes Away  मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानं शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दांडगा जनसंपर्क असलेल्या आमदाराच्या निधनानं मतदारसंघात देखील शोककळा पसरली आहे. ते कुटुंबासह दुबईत फिरायला गेले असताना काल सायंकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 52 वर्षात त्यांचा राजकीय प्रवास मात्र भन्नाट होता. शिवसेनेचा अंधेरी भागातला एक विश्वासू चेहरा अशी त्यांची ओळख होती.  गेल्या महिन्यात 21 एप्रिल रोजी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. 
रमेश लटके यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 
गटप्रमुख ते आमदार असा त्यांचा अफलातून राजकीय प्रवास होता. 
या प्रवासादरम्यान त्यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक ही आणि अशी विविध पदं यशस्वीरित्या भूषवली. 
लटके यांनी 1997 ते 2012 अशा सलग 3 वेळा नगरसवेक पद भूषवलं. 

त्यानंतर 2014 मध्ये लटके यांनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

Big blow to Shiv Sena: MLA Ramesh Latke dies of heart attack.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.