ब्रिजभूषण पाझारे यांच्या प्रयत्नातून आसम परिवाराला देवनील इण्डेन गॅस संचालकातर्फे ५० हजारांचे सहाय्य Brijbhushan Pazhare Indian Gas

ब्रिजभूषण पाझारे यांच्या प्रयत्नातून आसम परिवाराला देवनील इण्डेन गॅस संचालकातर्फे ५० हजारांचे सहाय्य

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, 03 मे: चंद्रपुर तालुक्यातील नकोडा येथे २९ एप्रिल ला झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात नकोडा गावातील रहवासी आसम परिवारातील तीन व्यक्ती गंभीर रित्या जखमी झाले होते. आसम परिवाराची आर्थिक स्थिती बरी नसल्यामुळे जखमी रुग्णांना आर्थिक साहाय्य तसेच उच्च दर्जाच्या उपचार मिळण्याकरिता ब्रिजभूषण पाझारे व त्यांची टीम प्रयत्न करीत होते. दि. ०२ मे ला ब्रिजभूषण पाझारे यांनी देवनील इण्डेनच्या व्यवस्थापक श्री भांडेकर यांची भेट घेऊन आर्थिक सहाय्य तसेच उच्च दर्जाचे आरोग्य उपचार जखमी परीवाला झाले पाहिजे यासाठी विनंती केली होती. त्याविनंतीला अनुसरून आज दि. ०३ मे रोजी नकोडा येथे देवनील इण्डेन गॅस चे संचालक माजी आमदार श्री देवरावजी भांडेकर व व्यवस्थापक डॉ.महेश भांडेकर यांनी गॅस स्फोटात जखमी आसम परीवाला राशी पन्नास हजार रुपये आर्थिक सहाय्य केले आहे. तसेच त्यांचा उपचार योग्य पद्धतीने झाला पाहिजे या करिता संपूर्ण सहकार्य करण्याची हमी दिली आहे.

यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, सरपंच किरण बांदुरकर, माजी सरपंच ऋषी कोवे, उपसरपंच मंगेश राजगडकर, ग्रा.प सदस्य रजत तुरानकर, राजय्या कंप्पा , प्रभाकर लिंगमपेल्ली, व आसम परिवार तसेच नागरिक उपस्थित होते.

Brijbhushan Pazhare Indian Gas.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.