चंद्रपुर जिल्ह्यातील पोलिस एक्शन मोड़ वर, साडेचार लाखाचा सुगंधित तंबाखू जप्त Police in Chandrapur district seize 4.5 lakh worth of aromatic tobacco

चंद्रपुर जिल्ह्यातील पोलिस एक्शन मोड़ वर

साडेचार लाखाचा सुगंधित तंबाखू जप्त

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर/भद्रावती : उपविभागीय पोलिस अधिकारी IPS आयुष नोपानी व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा यांनी संयुक्त कारवाई करून वराडकर लेआऊट येथील आरोपी विजय गायकवाड यांच्या घरी गाडीत ठेवलेला साडेचार लाखाचा सुगंधित तंबाखू व एक लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन असा एकूण साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपीस अटक करून भद्रावती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांना गुप्त माहितीवरून कळले की, वरडकर लेआऊट येथील विजय गायकवाड हा सुगंधित तंबाखूची अवैध विक्री करीत आहे. त्याआधारे उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी व भद्रावती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा यांनी संयुक्त कारवाई करून आरोपी गायकवाड यांच्या घरासमोर ठेवून असलेली फोर व्हीलर गाडी क्रमांक एम एच 34 एए 3117 मध्ये साडेचार लाखाचा सुगंधित तंबाखू ठेवून असल्याचे आढळले. त्यावरून त्यांची विचारपूस करून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व तंबाखू, सदर चारचाकी वाहन असा साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक केली. पोलीस स्टेशन भद्रावती येथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

Police in Chandrapur district seize 4.5 lakh worth of aromatic tobacco.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.