सुरेश रामगुंडे यांच्या निधनाने राजकीय , सामाजिक क्षेत्राची मोठी हानी : आ. सुधीर मुनगंटीवार With the demise of Suresh Ramgunde, a great loss to the political and social sphere. mla Sudhir Mungantiwar

सुरेश रामगुंडे यांच्या निधनाने राजकीय , सामाजिक क्षेत्राची मोठी हानी : आ. सुधीर मुनगंटीवार

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 16 मे: सुरेश रामगुंडे यांच्या निधनाने राजकीय , सामाजिक क्षेत्रातील तडफदार कार्यकर्ता तसेच उत्तम पत्रकार आपण गमावला असल्याची शोकभावना  माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

गेली अनेक वर्षे विदर्भ चण्डिका च्या माध्यमातून ते पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत होते. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून त्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत समाजाची सेवा केली. वैचारिक बैठक जरी भिन्न असली तरी सर्वच पक्षातील पदाधिका-यांशी त्यांचे घनिष्ट सम्बंध होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वर देवो व मृताम्यास शांती प्रदान करो असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्हटले आहे.

With the demise of Suresh Ramgunde, a great loss to the political and social sphere.  mla Sudhir Mungantiwar.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.