शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सुरत एअरपोर्टवर एयर लिफ्ट केल जाणार
सूरत एयरपोर्ट वर 3 विमान सज्ज
मुंबई- शिवसेनेत बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि शेवसेनेचे नेते आणखी अनरिचेबल होण्याची शक्यता आहे, कारण या सगळ्या आमदारांना आसाममध्ये (Guvahati, Aasam)नेलं जाणार आहे. त्यांना रात्रीतून एयर लिफ्ट (Air lift)करुन त्यांना आसाममध्ये गुवाहाटीला नेलं जाण्याची माहिती आहे. यासाठीचे विमान सुरत एयरपोर्टवर आलेले आहे. एकनाथ शिंदे यांनी सोबत आणलेल्या काही आमदारांना आपण कुठे नेले जात आहे, याची महितीच रात्री नव्हती, अशीही माहिती समोर येते आहे. त्यामुळे आता हे आमदार मुंबईत परततील, तसेच हॉटेलातून पळून जाण्याची भीती एकनाथ शिंदेंना असल्याची माहिती आहे, त्यामुळेच या आमदारांना थेट आसाममध्ये गुवाहाटीला नेण्यात येणार आहे. त्यासाठी तीन चार्टर प्लेनही तयार ठेवण्यात आले आहेत. एकूणच हा सत्तासंघर्ष अधिक तीव्र होत चालल्याचे हे संकेत आहेत.
सूरतमध्ये आलेल्या शिसेनेच्या आमदारांपैकी काही जण हे एकनाथ शिंदेंच्या गटाचे आहेत, मात्र काही आमदारांना रात्री वसईला बोलवण्यात आले, तिथून स्नेहभोजन आहे, असे सांगून सुरतला नेण्यात आल्याची माहिती आहे. यातील ३ ते ४ आमदार हे रात्रीतून पालघर सीमेवरुन चिखलातून चालत पळून आल्याची माहिती आहे. अशा स्थितीत आणखी काही आमदारही सुरतमधून जातील अशी शक्यता आहे, त्यामुळेच त्यांना आसाममध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान ली मेरेटियन हॉटेलात भाजपाचे पदाधिकारी मोहित कम्बोज असल्याचे फोटो बाहेर आले आहेत. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. भाजपाचे आणखीही काही नेते आणि पदाधिकारी तिथे पोहचले आहेत. आता आसामामध्ये हे आमदार नेल्यानंतर, त्यांचा राज्याशी संपर्क होणे थोडे अवघड आहे. दरम्यान आमदार नितीन देशमुख यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून, त्यांना पाहण्यासाठी एकनाथ शिंदे आले होते. त्यांना घेऊन शिंदे हॉटेल ली मेरेडियन यांना नेण्यात आल्याची माहिती आहे. सूरतमध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तात मध्यरात्री शिवसेनेच्या आमदारांना गुवाहाटीला नेण्यात येण्याची शक्यता आहे.
The big news right now.
Shiv Sena rebel MLAs to be airlifted to Surat airport.
3 planes ready at Surat Airport.