मी पुन्हा येतोय,द ेवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा शपथविधी आज संध्याकाळी 7 वाजता एवढी घाई का? हे आहे मुख्य कारण? I'm coming again, Devendra Fadnavis and Eknath Shinde will be sworn in at 7 pm today Why so fast Is this the main reason?

मी पुन्हा येतोय,

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा शपथविधी आज संध्याकाळी 7 वाजता

 एवढी घाई का? हे आहे मुख्य कारण?

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून आज संध्याकाळी सात वाजता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आज रात्री सात वाजता शपथ घेणार आहेत.

👉🏻 बंडखोरांची एकजूट ठेवण्यासाठी प्रयत्न
एकनाथ शिंदे म्हणतील तोच नेता आणि तोच पक्ष ही बंडखोर आमदारांची भूमिका असली तरी ऐनवेळी कोणती अडचण निर्माण होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे शपथविधी घेतील असा अंदाज आहे. मंत्रीपादाचे सूत्र चित्र स्पष्ट असले तरी आमदारांची नाराजी होऊ नये म्हणून मुंबईत दाखल झालेल्या शिंदे यांनी थेट देवेंद्र फडवणवीस यांचा सागर बंगला जवळ केला होता. कोण मंत्री, उपमुख्यमंत्री याबाबत त्यांनी सावध भूमिका घेतली असून राज्यपालांची भेट घेतल्यानंतरच सर्वकाही स्पष्ट बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

एवढी घाई का? हे आहे मुख्य कारण?
बंडखोर आमदार हे हिदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणार असले तरी मंत्री पदाबाबत प्रत्येकाच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. पण याबाबत नावे जाहीर झाली तर नाराजांची संख्या वाढेल आणि ऐनवेळी धोका निर्माण होईल म्हणून प्रत्येक पाऊल आता काळजीपूर्वक टाकले जात आहे. त्यामुळे सुरवातीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होऊन पुन्हा मंत्रीमंडळाचा विस्तार अशी रणनिती आहे.

I'm coming again,

Devendra Fadnavis and Eknath Shinde will be sworn in at 7 pm today

Why so fast  Is this the main reason?