चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे नळजोडणी बंद होणार, थकीत पाणीपट्टीचा भरणा त्वरित करा; अन्यथा नळजोडणी बंद होणार Chandrapur City Municipal Corporation will close the pipe connection, pay the exhausted water bill immediately; Otherwise the plumbing will be closed

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे
नळजोडणी बंद होणार

थकीत पाणीपट्टीचा भरणा त्वरित करा; अन्यथा नळजोडणी बंद होणार
 
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर ८ जुन : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे थकीत पाणीपट्टी वसुलीची मोहीम सातत्याने सुरु असुन पाणीपट्टी कर न भरणाऱ्या लाभधारकांचे नळ जोडणी बंद करण्याची कारवाई मनपा पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येणार आहे.  

आर्थिक वर्ष २०२२-२३ करीता रू. १२.९७ कोटी थकीत मागणी व रू. ०५.४५ कोटी चालू मागणी अशी एकूण रू. १८.४३ कोटी पाणीपट्टी कराची वसुली थकीत आहे. मोठ्या प्रमाणात करवसुली थकीत असल्याने मनपातर्फे करवसुली मोहीम राबविण्यात येत आहे. थकीत पाणीपट्टी कराचा भरणा प्रियदर्शिनी चौक येथील कार्यालय, झोन कार्यालय क्र. १ संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स,  झोन कार्यालय क्रमांक २ कस्तुरबा भवन सात मजली इमारत गांधी चौक, झोन कार्यालय क्रमांक ३ देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा बंगाली कॅम्प येथे करता येऊ शकतो.  

नळजोडणी बंद होऊ नये यासाठी पाणीपट्टी कराचा भरणा लवकरात लवकर करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  

Chandrapur City Municipal Corporation will close the pipe connection, pay the exhausted water bill immediately;  Otherwise the plumbing will be closed.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.