राज्यात लवकरच सत्तापालट होणार अशी दाट शक्यता
भाजप आणि शिंदे गटाच्या सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरला?
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राजकारणात मोठा भूंकप झाल्यानंतर आता सत्तानाट्य अंतिम टप्प्यात असल्याचं पाहायला मिळतंय. आतापर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने आता अधिकृतपणे सत्तासंघर्षात एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळतंय. काल भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर आत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांची त्यांनी भेट घेतलीय. तसंच ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर भाजपा आणि शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युलाही ठरल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे राज्यात लवकरच सत्तापालट होणार अशी दाट शक्यता असल्याचं बोललं जातंय.
मी पुन्हा येईन.. .असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न साकारण्याची वेळ आलीय, अशी शक्यता सध्याच्या राजकील हालचालींवरून दिसून येतेय. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतील. महाराष्ट्रात भाजपकडून सत्ता स्थापनेसाठीचा दावा कधी करण्यात येईल, या प्रमुख मुद्दयावर या भेटीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. काल एकिकडे सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने कौल दिला असताना शिंदे गटातील आमदारांवरची अपात्रतेची कारवाई तूर्तास टळली आहे. त्यामुळे शिंदे गटासमोरील आव्हाने कमी झाली आहेत. तर एकडे भाजपच्या गटातील हालचालीही वाढल्या आहेत. शिंदेंच्या बंडखोरीमागे आमची काहीही भूमिका नसलेले भाजप कालपासून आत्मविश्वासाने वावरत आहे. एकिकडे सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत होता, तसा देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या गोटातील नेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक काल सागर बंगल्यावर झाली. त्यात महाराष्ट्रातील नवीन सरकार स्थापनेसाठी काय रणनीती आखायची यावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय..
➡️ आषाढ अमावस्येनंतरच प्रस्ताव देणार
आषाढ अमावस्येनंतर सत्ता स्थापनेचा प्रस्ताव राज्यपालांना दिला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. बुधवारी सकाळी 8.41 नंतरचा सरकार स्थापनेचा मुहूर्त असेल असंही सांगितलं जातं. त्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होत असल्याचंही सांगितलं जात आहे.
Devendra Fadanvis, Maharashtra
I will come again .., there is a strong possibility that there will be a change of government in the state soon, the formula for the BJP and Shinde group to come to power?
बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.