Raj Thackeray : राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना पत्र, हा विषय कायमचा संपवायचाय s letter to MNS workers, I want to end this subject forever

Raj Thackeray : राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना पत्र, 

हा विषय कायमचा संपवायचाय

#Loktantrakiawaaz
मुंबई, 2 जुन  : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मनसे कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंगा या विषयाकडे लक्ष वेधलेय. आता राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांना प्रत्येक घराघरात जाण्याचं आव्हान केलेय. राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून आपला मुद्दा पुन्हा एकदा पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. तसेच पत्रात भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा असल्याचेही त्यांनी सांगितलेय. त्यासाठी त्यांनी एक पत्र लिहिलेय. हे पत्र प्रत्येक पदाधिकाऱ्यांपर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषेत पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलेय. ते पत्र मनसे सैनिकांना प्रत्येक घरात पोहचवण्याची विनंती केली आहे. व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही, असेही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलेय.

राज ठाकरे म्हणतात, “माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा.”
तसेच, “तुम्ही एकच करायचं आहे - माझं पत्र तुम्ही - राहता त्या परिसरातील घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. ”असं देखील राज ठाकरेंनी सांगितलं आहे. याचबरोबर,“ मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही. ”असा विश्वास देखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

Raj Thackeray: Raj Thackeray's letter to MNS workers.

 I want to end this subject forever.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.