महाराष्ट्र गणेश उत्सव 2022, या वर्षी गणपती बाप्पा मूर्तींच्या उंचीवर मर्यादा नाही, गणेश मंडळांच्या रजिस्ट्रेशनसाठी एक खिडकी योजना राबवण्यात येणार, मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा Maharashtra Ganesh Utsav 2022, This year there is no limit on the height of Ganapati Bappa idols, one window scheme will be implemented for registration of Ganesha mandals, CM's big announcement

महाराष्ट्र गणेश उत्सव 2022

या वर्षी गणपती बाप्पा मूर्तींच्या उंचीवर मर्यादा नाही,

गणेश मंडळांच्या रजिस्ट्रेशनसाठी एक खिडकी योजना राबवण्यात येणार

मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा

मुंबई : यंदाचा गणेशोत्सव, दहीहंडी तसेच मोहरम धुमधडाक्यात साजरा होणार आहे, त्यावरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गणेश मूर्तींच्या उंचीवर यंदा मर्यादा असणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. गणेशोत्सव आणि इतर सण सुरळीत पार पाडण्यासाठीच्या नियमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्यासह यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते. ते म्हणाले, की गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. मंडप आणि इतर परवानग्या सुटसुटीत झाल्या पाहिजेत, यासाठी खेटे घालायला लागू नये, म्हणून एक खिडकी योजना आणि ऑनलाइन परवानग्या दिल्या आहेत. या मंडळांना कोणत्याही प्रकारचं नोंदणी शुल्क भरावे लागणार नाहीत, याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना शुल्कातून सूट दिली आहे, असे एकनाथ शिंदे  म्हणाले आहेत.

वर्षानुवर्ष गणेशोत्सव करणाऱ्यांकडून हमी पत्र घेऊ नका असे त्यांनी सांगितले. नियमांचे पालन करावे लागेल. पण त्याचा बागुलबुवा उभा करू नये, याच्या सूचना केली आहे. मुंबईची जी नियमावली आहे. तीच राज्यभर लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मूर्तींच्या उंचीवर मर्यादा होती. ती काढून टाकली आहे, असे शिंदे म्हणाले.

दहीहंडीबाबतही त्यांनी नियमावली सांगितली. नियम पाळण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. सर्व उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडले पाहिजेत. कोविडचे संकट टळले आहे. त्यामुळे सर्वांमध्ये उत्साह आहे. मिरवणुका जोरात होणार असल्याचे ते म्हणाले. आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका निघणार आहेत. यंदा काहीच अडचण नाही. कोविडचे नियम सध्या शिथिल करण्यात आलेले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार नियमांचे पालन होईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

उत्सवाच्या काळातील बस सुविधांबाबतही त्यांनी माहिती दिली आहे. दरवर्षी मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्गे आणि कोकणात टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी बसेस वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कोविडच्या काळात आपल्याला गणेशोत्सव साजरा करता आला नव्हता. निर्बंध असल्याने सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या. यावेळी त्यावरील निर्बंध मागे घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 

Maharashtra Ganesh Utsav 2022, This year there is no limit on the height of Ganapati Bappa idols, one window scheme will be implemented for registration of Ganesha mandals, CM's big announcement