चंद्रपुर जिल्हा, महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन
नदी काठावरील नागरिकांनी व्हावे स्थलांतरित
चंद्रपूर, 11 जुलै : चंद्रपुर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज सोमवारी ११ जुलैला दिवसभर पाऊस चांगलाच बरसला. त्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरू वाहत आहेत. भारतीय हवामान खाते यांनी चंद्रपूर जिल्ह्याकरिता १२ जुलैला सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून रेड अलर्ट जारी केला आहे.
या कालावधीत जिल्ह्यात एक दोन ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसासह व विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनांचा इशारा दिला आहे. तसेच चंद्रपुर जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी देखील वाढत असल्यामुळे नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. इरईचे एक आणि सात क्रमांकाचा दरवाजा २५ से.मी. ने उघडला आहे. संभाव्य पुरपरिस्थिती लक्षात घेता नदीकाठावरील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी शेतात लागणारी अवजार तसेच जनावरांना सुरक्षित स्थळी हलवावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले. त्यामुळे इरई नदील लगतचा वडगाव वॉर्ड, हवेली गार्डन, महसूल कॉलनी, सिस्टर कॉलनी, रहेमत नगर, झरपट नदी लगतच्या भंगाराम , सोनारी मोहल्ला, दादमहल काजीपुरा वसाहत या परिसरातील नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे असे आवाहन चंद्रपूर शहर महानगर पालिकेने केले आहे. मनपा प्रशासनाने भोजन आणि निवासाची व्यवस्था करुन ठेवलेली आहे.
ध्वनिक्षेपकावरुन नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. पाणी वस्त्यांत घुसले तर लोकांनी त्वरित मदत पोहचविण्यासाठी चंद्रपुर शहर महानगर पालिका प्रशासन सज्ज असल्याचे समजते.
Chandrapur District Red Alert.
Appeal of Chandrapur District, Municipal Administration.
Citizens along the river should be migrants.