चंद्रपूर महानगरपालिका द्वारे पुरग्रस्त भागातील ६७७ नागरीकांना सुरक्षीत स्थळी आणण्यात आले, चंद्रपुर शहरातील या परिसरात रेस्क्यु ऑपरेशन राबवुन्यात आले Chandrapur Municipal Corporation evacuated 677 people from the flood-hit areas and carried out rescue operations in the area.

चंद्रपूर महानगरपालिका द्वारे पुरग्रस्त भागातील ६७७ नागरीकांना सुरक्षीत स्थळी आणण्यात आले 

चंद्रपुर शहरातील या परिसरात रेस्क्यु ऑपरेशन राबवुन्यात आले 

चंद्रपूर १४ जुलै - चंद्रपूर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन टीमद्वारे पुरग्रस्त भागातील ५९१ नागरीकांना सुरक्षीत स्थळी आणण्यात आले आहे. रहमत नगर, सिस्टर कॉलोनी, राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, ठक्कर कॉलोनी (सिस्टर कॉलोनी)
येथे रेस्क्यु ऑपरेशन राबवुन नागरीकांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले आहे.
चंद्रपुर मनपाच्या महाकाली कन्या शाळा येथे ११४, माना प्राथमिक शाळा येथे ८०, शहिद भगतसिंग शाळा येथे ३५, महात्मा फुले शाळा येथे २१६, किदवई शाळा येथे ८५  जेष्ठ नागरिक संघ येथे ४६  तर अग्रसेन भवन येथे १५ नागरीकांना ठेवण्यात आले असुन त्यांची व्यवस्था व देखभाल करण्यात येत आहे. महानगरपालिकेद्वारा आपत्ती व्यवस्थापन टीम सतत कार्यरत असुन अनेक रहिवासी भागात पाणी शिरल्याने नागरीकांना बाहेर काढण्याची मोहीम रात्रीपासून सुरु आहे.
👉🏻  पूरबाधित क्षेत्रे (सद्यस्थिती )
रहमत नगर, सिस्टर कॉलोनी, राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, ठक्कर कॉलोनी (सिस्टर कॉलोनी), आंबेडकर भवन वडगाव. 

👉🏻 रेस्क्यु ऑपरेशन अंतर्गत सुरक्षीत स्थळी नेण्यात आलेल्या पूरबाधितांची संख्या - ६७७ (सद्यस्थिती )

१. महाकाली कन्या शाळा - ११४
२. माना प्राथमिक शाळा - ८०
३. शहिद भगतसिंग शाळा - ३५
४. महात्मा फुले शाळा- २१६
५. जेष्ठ नागरिक संघ - ४७
६. अग्रसेन भवन - १५
७.  हिस्लाॅप स्कूल - ८
८. किडवाई स्कूल - १५०
९. सरदार पटेल स्कूल - ८
१०. लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा - ४

Chandrapur Municipal Corporation evacuated 677 people from the flood-hit areas and carried out rescue operations in the area.