मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये, पूरस्थितीच्या पाहणीसाठी तातडीचा गडचिरोली दौरा Chief Minister Eknath Shinde in action mode, an emergency visit to Gadchiroli to inspect the situation

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये,

पूरस्थितीच्या पाहणीसाठी तातडीचा गडचिरोली दौरा

गडचिरोली, 11 जुलै : गडचिरोलीसह (Gadchiroli) विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळेच पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गडचिरोलीमध्ये तीन दिवसांचा रेड अलर्ट जारी केला आहे. पूर परिस्थितीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सोमवारी (ता. ११) गडचिरोलीला येणार आहे. (Eknath Shinde and Devendra Fadnavis). मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हा पहिला विदर्भ दौरा आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे (Gadchiroli) पालकमंत्री होते. आता ते मुख्यमंत्री म्हणून गडचिरोलीचा दौरा करणार आहे. यामुळेच दुपारची एमएमआरडीएची बैठक रद्द करण्यात आली आहे. दुपारी चार वाजता एकनाथ शिंदे हे  अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता पूर परिस्थितीबाबत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन सोबत आढावा बैठक घेणार आहेत.

Chief Minister Eknath Shinde in action mode.
An emergency visit to Gadchiroli to inspect the situation.