चंद्रपुर: चंद्रपूर जिल्हात मागील ४-५ दिवसांपासून सतत अतिवृष्टी होत आहे. इरई धरणाचे सर्व ७ दरवाजे उघडल्याने चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील रहमतनगर, सिस्टर कॉलनी, विठोबा खिडकी, पठाणपुरा या पूरग्रस्त भागात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहीर यांनी भेट देत पूर परिस्थितीची पाहणी केली. पुरग्रस्त कुटुंबाना मदत करण्यात, त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात, जेवणाची व्यवस्था यासाठी महानगर प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवक राहुल पावडे, प्रशांत चौधरी, सविता कांबळे, या भागातील नागरिक, महावीर इंटरनॅशनल व अन्य सामाजिक संस्था चांगले कार्य करीत असल्याचे अहीर म्हणाले. महानगर पालिका अधिकाऱ्यांची, माजी नगरसेवकांची, नागरिकांची भेट घेत अहीर यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपा नेते खुशाल बोन्डे, विनोद शेरकी, सचिन कोतपल्लीवार, राजेंद्र खांडेकर, सूर्यकांत कुचनकर, राजू येले, रवी चहारे, पूनम तिवारी, गौतम यादव व अन्य पदाधिकारी, कार्यकतें उपस्थित होते.
Former Union Minister of State for Home Hansraj Ahir inspected the flood affected area in Chandrapur city