चंद्रपुरात एकीकडे पूरस्थिती तर दुसरीकडे चोरांचा धुमाकूळ
चन्द्रपुरच्या उमाटे ले आउट येथिल प्रकार लाखोचा एवज लंपास
चंद्रपुर: चंद्रपुर शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नगिनाबाग परिसरात पुरामुळे नातलगांकडे आश्रयास गेलेल्या 4 ते घरी घरफोडी होऊन चोरी झाल्याची घटना घडली.
एकीकडे पुर परस्थिती या मुळे पूरग्रस्त जनता त्रस्त परंतु दुसरीकडे चोरांचा चोरीचा धुमाकूळ त्यामूळे काही कुटूंब आर्थीक संकटात सापडली आहे.
असाच प्रकार चंद्रपुर च्या सिस्टर काॅलनि नजीक उमाटे ले आउट मध्ये काल रात्रो घर सोडून बाहेर आश्रयस्थान घेणा-या चार ते पाच कुटुंबाच्या घरी घरफोडुन चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. यात लाखो रुपयाचा ऐवज चोरांनी लंपास केला.
प्राप्त माहिती नुसार चंद्रपुर येथिल सिस्टर काॅलनी नजीक उमाटे लेआउट मध्ये जोगेश्वर आवळे व अश्वनी आवळे आपल्या कुटुंबासह राहतात. पुराचे पाणी घरात शिरल्याने वरच्या माळ्यावर राहून पुरात दोन ते तिन दिवस काढले, पुर ओसरल्यावर घरात दुर्गंधी व चिखल साचल्याने आवळे परिवार आपल्या नातलगांकडे रहावयास गेले, दुस-या दिवशी घराची साफसफाई केली व नातेवाईकांकडे मुक्कामास राहीले व दुस-या दिवसी परत घरी रहायला गेले. परंतू १७ जुलै रोजी घराची चोरी झाली. यात घरातील सम्संग ची 40 इन्ची एल ई डी टीव्ही (#LED #TV) अंदाजे किमत ५३ हजार रुपये, लॅपटाप (#Laptop) अंदाजे किंमत चाळीस हजार, व मोबाइल (#Mobile) अंदाजे किमत वीस हजार रुपये अशी एकुण एक लाखाचा ऐवज चोरानी लंपास केला. नातलगांकडुन घरी परत आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
त्वरित रामनगर पोलिस स्टेशन गाठण याची माहिती पोलिसाना दिली. घटनेचे गांभीर्य पाहुन डीबी चे पोलिस उपनिरिक्षक विनोद बोरुले, जमादार अशोक मरस्कोल्हे, शिपाई विकास जाधव, सुजित शेंडे, यानी घटनास्थळी येवुन घटनेची पाहणी केली.
पुढिल तपास रामनगर पोलीस करीत आहे.
एकिकडे पुरस्थितीमुळे परेशान झालेली जनता तर चोरी ने झालेले आर्थिक नुकसान यामुळे अशा दोन्ही संकटात सापडल्याने पूरग्रस्त नागरिक भयभित झाली आहे. चोरांचा शोध लावुन पूरग्रस्त भागातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी जनता करु लागली आहे.
Thieves' fume in flood situation, flood situation in Chandrapur on one side and thieves' fume on the other, Chandrapur's Umate layout.