❇️ तिरंगा यात्रेदरम्यान चंद्रपुरात काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया - भाजपचे कैबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार एकत्र
❇️ मुसळधार पावसात निघाली 1500 फूट तिरंगा रॅली
चंद्रपूर, 15 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य आज 15 ऑगस्टला चंद्रपूरात भर पावसात 1500 फूट तिरंगा रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे या रॅलीला भाजपचे जेष्ठ नेते तथा नवनियुक्त वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखविली. ही रॅली काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. चंद्रपुर शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या रॅलीत भर पावसात विद्यार्थी नागरिक सहभागी झाले होते. तिरंगा रॅलीच्या निमित्ताने काँग्रेस- भाजपचे दोन दिग्गज एकत्र आल्याचा दुर्मिळ प्रसंग आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पहायला मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तिरंगा यात्रेच्या निमित्ताने चंद्रपुरात काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया व भाजपचे जेष्ठ नेते व कैबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार एकत्र आल्याचे चित्र बघायला मिळाले. भाजप नेते वन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रपुर शहरातील गांधी चौकात 1500 फूट तिरंगा रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. माजी खासदार ज्येष्ठ काँग्रेस नेते नरेश पुगलिया यांच्या पुढाकाराने ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. चंद्रपुर शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या रॅलीत मुसळधार पावसात हजारो विद्यार्थी नागरिक सहभागी झाले. रॅलीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपचे दोन दिग्गज ध्रुव एकत्र आल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या. तिरंगा म्हणजे लाखो शहीदांच्या हौतात्म्याचे गौरवपूर्ण स्मरण असल्याचे मत सुधीर मुनगंटीवार यांनी रॅलीचा प्रारंभ करताना मांडले.
या कार्यक्रमात युवा नेते राहुल पुगलिया आणि करण पुगलिया यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली, जी चंद्रपुरतील ऐतिहासिक गांधी चौकातून जटपुरा गेट मार्गे निघून कस्तुरबा मार्गाने गांधी चौकात आली, या रॅलीचे विसर्जन करण्यात आले. हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शवली.
रिमझिम पावसातही लोकांचा उत्साह दिसून येत होता आणि या उत्साहाने ही रॅली अविस्मरणीय ठरली.
या रॉली मध्ये एनसीसी कॅडेट्स, न्यू इंग्लिश हायस्कूल, एफईएस कॉलेज, इंदिरा गांधी गार्डन स्कूल, विद्या निकेतन स्कूल, मातोश्री स्कूल व इतर शाळा-महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थी, त्यांचे शाळेतील कर्मचारी, शिक्षक, कामगार क्षेत्रातील नेते व कामगार, चंद्रपूर येथील कामगारांसह तिरंगा रॅलीत सर्व मान्यवर, नेते, व्यापारी यांनी सहभाग घेऊन ही भेट संस्मरणीय बनवली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मुलांना, शाळेतील कर्मचारी व नागरिकांना स्वादिष्ट फराळाचे वाटप करण्यात आले.
Former Congress MP Naresh Puglia - BJP Cabinet Minister Sudhir Mungantiwar together in Chandrapur during Tiranga Yatra, 1500 feet Tiranga rally started in heavy rain.