⏹️ शहीद स्मृतीस्थळावर हंसराज अहीर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण
चंद्रपूर :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी भारत मातेच्या अगणीत सुपूत्रांनी आपले बलिदान दिले सर्वस्व गमावले या सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या हौतात्म्यातुन मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी विद्यमान व भावी पिढ्यांना राष्ट्र समर्पित कार्यातून स्वातंत्र्याला चिरायू राखायचे आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त चंद्रपूर जिल्हा कारागृह परीसरातील क्रांतिवीर शहीद बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या शहीदस्थळी ध्वजारोहण केल्यानंतर पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर बोलत होते.
श्री. अहीर यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की शहीद वीर बाबुरावजी शेडमाके यांचे हे स्मारकस्थळ सर्वासाठी प्रेरणास्त्रोत आहे. त्याना कारागृह परिसरातील पिंपळाच्या झाडावर ब्रिटिशांनी फासावर दिले होते. आपणा सर्वासाठी हे स्मृतीस्थळ श्रध्दास्थान असतानाच जाज्वल्य राष्ट्रभक्तीसाठी सदैव प्रेरणा देणारे आहे. केवळ आदिवासी बांधवांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी हे स्थळ पवित्र आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या आवाहनानूसार आज संपुर्ण देश तमाम हुतात्म्यांचे स्मरण करुन अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवस साजरा करित आहे असेही ते म्हणाले. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देवून पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री पुढे म्हणाले की भारतीयांना मिळालेले हे स्वातंत्र्य मातृभुमिच्या अनेक सुपुत्रांच्या बलीदान व त्यागातून मिळाले आहे. "रणाविना स्वातंत्र्य कुणा मिळाले" या वीर सावरकर यांच्या वाक्याची आठवण करुन दिले, आझाद हिन्द सेनेचे सुभाषचंद्र बोस या स्वातंत्र्यवीराच्या सशस्त्र कांतीने, बलिदानाने तसेच म. गांधी यांच्या असहकार व शांततेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळाले. यावेळी हंसराज अहीर व अन्य मान्यवरांचे हस्ते शाळकरी विद्यार्थ्यांना नोटबुक चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी माजी उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजू घरोटे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, महानगर ओबीसी मोर्चा अध्यक्ष विनोद शेरकी, अनुसूचित जमाती आघाडी महानगर अध्यक्ष धनराज कोवे, ओबीसी महिला आघाडी महानगर जिल्हा संयोजक वंदना संतोषवार, भटक्या विमुक्त जाती महानगर अध्यक्ष दिवाकर पुद्दटवार, मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, गणेश गेडाम, मोहन चौधरी, माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार, मायाताई उईके, प्रदीप किरमे, ज्योतीताई गेडाम, चंद्रकलाताई सोयाम, शीतल आश्रम, शीतल कुळमेथे, श्रीकांत भोयर, पूनम तिवारी, गौतम यादव, बाळू कोलनकर, अशोक सोनी, तुषार मोहुर्ले, चंद्रप्रकाश गौरकर, अरविंद मडावी, यशवंत सिडाम, कमलेश आत्राम, प्रकाश कुंभरे, विठ्ठल कुंभरे, अमर चांदेकर, प्रवीण चुनारकर, शालिनी वासमवार, रेखाताई मडावी, शिलाताई गेडाम, नीलिमाताई आत्राम, श्याम मडावी, अनिल सुरपाम, कमलेश आत्राम, सीमाताई मडावी, प्रीती दंडमल, राखीताई कोवे, प्रीती आश्रम, मुग्धा खांडे, भारतीताई निकम, भूमिका मडावी, कार्तिक मडावी, श्रावण आश्रम, नितीन लसूते. मेघाताई वर्गटीवार, निताताई पिंपळकर यांचेसह अन्य नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
➡️ बिनबा गेट येथेही ध्वजारोहण
सदर ध्वजारोहण कार्यक्रमानंतर हंसराज अहीर यांनी ऐतिहासीक बिनबा गेट येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिवसाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उमाताई खोलापूरे, राजू येले, रेनुकाताई घोडेस्वार, निलेश खोलापूरे, सचिन सातपूते यांचेसह अनेक नागरिक उपस्थित होते. येथील शाळकरी विद्यार्थ्यांना सुध्दा मान्यवरांनी नोटबुकचे वितरण केले.
Armed revolution, non-violence and freedom for the country through the sacrifice of many - Hansraj Ahir, hoisting the flag with the auspicious hands of Hansraj Ahir at the martyr's memorial.