छोट्या व मध्यमवृत्तपत्रांच्या प्रश्नावर संघटनेच्या माध्यमातून नेहमीच आवाज उठवणार -प्रदीप कुलकर्णी Pradeep Kulkarni will always raise his voice on the issue of small and medium newspapers through the organization

छोट्या व मध्यमवृत्तपत्रांच्या प्रश्नावर संघटनेच्या माध्यमातून नेहमीच आवाज उठवणार -प्रदीप कुलकर्णी
 
गुवाहाटी -छोट्या व मध्यम वृत्तपत्रांच्या  प्रश्नावर असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ही संघटना नेहमीच आवाज उठवते आहे.  राष्ट्रीय पातळीवर या संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत . त्याचप्रमाणे काही प्रश्न मार्गी लावण्यात संघटना अजूनही प्रयत्नशील आहे, महाराष्ट्रात देखील ही संघटना छोट्या आणि मध्यम वृत्तपत्रांच्या प्रश्नासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय कार्यकारणी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील अशी ग्वाही गुवाहाटी येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

 यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेची महाराष्ट्र शाखा यापूर्वी सर्वात अग्रेसर असून ती नंबर एक होती . आणि यापुढेही संघटना देशात नंबर एक असेल त्यासाठी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील,  राष्ट्रीय सचिव प्रवीण पाटील,  राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य चंद्रशेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने सर्व प्रश्नावर शासनाशी संवाद साधून ते प्रश्न सोडवून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.  असेही ते म्हणाले.
या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष के डी चंडोला आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी व माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांचे त्यांनी यावेळी मनापासून आभार मानले आहेत.  या बैठकीला महाराष्ट्रातून राष्ट्रीय सचिव प्रवीण पाटील , राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य चंद्रशेखर गायकवाड,  राज्यसचिव मारुती गवळी , संघटन सचिव शोभा जयपुरकर आदी मान्यवर उपस्थित होते . 

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष के.डी चंडोला होते . यावेळी त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली.   त्याला सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली. बैठकीचे सूत्रसंचालन उत्तर प्रदेशचे अध्यक्ष श्याम सिंग पवार यांनी केले.  यावेळी विविध राज्यातील प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले.  तसेच वृत्तपत्रांना येणाऱ्या अडीअडचणी विषद केल्या . या सर्वावर मात करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून योग्य ते पावले उचलली जातील अशी ग्वाही संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष के डी चंडोला यांनी दिली. 
प्रारंभी आसाम राज्याच्या वतीने व्यासपीठावरील मान्यवर तसेच बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्व पदाधिकारी व राज्य अध्यक्षांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष बिनोद महापात्रा यांनीही मार्गदर्शन केले.  तसेच राष्ट्रीय संघटन मंत्री अनंत शर्मा यांनीही उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले.
 महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पत्रकार कल्याण निधीचा ऊहापोह केला आणि गंभीर आजाराच्या वेळी या योजनेतून पत्रकारांना  मदत केली जाते परंतु प्रस्ताव दाखल करूनही काहीही योग्य कारण न देता प्रस्ताव नाकारले जातात हे निदर्शनास आणून दिले , त्यावेळी याबाबतीत तक्रार नोंद करण्याचे आवाहन उत्तर प्रदेशचे अध्यक्ष तथा पीसीआय चे सदस्य श्याम सिंग पवार यांनी सांगितले.  आणि याप्रकरणी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले.  या बैठकीला देशभरातील अनेक राज्यातून राज्य अध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. 
 शेवटी आसाम राज्याच्या वतीने राज्य अध्यक्ष जी. के. काजी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Pradeep Kulkarni will always raise his voice on the issue of small and medium newspapers through the organization