‘हर घर झेंडा’ अभियानांतर्गत सायकल रॅलीद्वारे जनजागृती, विद्यार्थी, क्रीडाप्रेमी, नागरिकांचा सहभाग Public awareness, participation of students, sports lovers, citizens through cycle rally under 'Har Ghar Zenda' campaign

‘हर घर झेंडा’ अभियानांतर्गत सायकल रॅलीद्वारे जनजागृती

Ø विद्यार्थी, क्रीडाप्रेमी, नागरिकांचा सहभाग

चंद्रपूर, दि. 5 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर झेंडा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच नागरिकांनी उत्स्फुर्तपणे या अभियानात सहभागी व्हावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासन, जि.प. शिक्षण विभाग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.5 ऑगस्ट) चंद्रपूर शहरातून सायकल रॅली काढण्यात आली.
जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथून आमदार किशोर जोरगवार, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक समशेर सुभेदार, पोलिस निरीक्षक श्री. मुळे आदी उपस्थित होते. 
सदर रॅली जिल्हा क्रीडा संकूल येथून मित्रनगर, केवलराम चौक, सेंट मायकल स्कूल, जटपूरा गेट, गिरनार चौक, गांधी चौक, परत जटपुरा गेट, प्रियदर्शनी चौक, वरोरा नाका, जिल्हाधिकारी निवासस्थान या मार्गाने गेल्यानंतर जिल्हा क्रीडा संकूल येथे समारोप करण्यात आला.
सायकल रॅलीमध्ये शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, सायकल क्लब, विविध क्रीडा मंडळे, अधिकारी व कर्मचारी, क्रीडाप्रेमी सहभागी झाले होते. या कार्यक्रमास यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथील कर्मचारी व इतर खेळाडूंनी सहकार्य केले.
Chandrapur.
Public awareness, participation of students, sports lovers, citizens through cycle rally under 'Har Ghar Zenda' campaign.