महाराष्ट्र सरकार ची मोठी घोषणा, नवरात्रोत्सवात हे 3 दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट #Maharashtra-Government #Big-Announcement #Navratri-Festival #Exemption-From-Loudspeaker

महाराष्ट्र सरकार ची मोठी घोषणा

नवरात्रोत्सवात "हे 3 दिवस" रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट

मुंबई: महाराष्ट्रात यावर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करता यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनिक्षेपक वापरास वाढीव दिवसाची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. 
त्यानुसार १, ३ आणि ४ ऑक्टोबरला सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरता येणार आहे.

यावर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करता यावा यासाठी १ ऑक्टोबर, २०२२ रोजी नवरात्रोत्सवासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी सोमवार, ३ ऑक्टोबर आणि मंगळवार, ४ ऑक्टोबर या व्यतिरिक्त शनिवार, १ ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार आहे. 
पर्यावरण व वातवरणीय बदल विभागाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये वर्षामध्ये एकूण १५ दिवस निश्चित करुन सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट जाहीर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून १३ दिवस निश्चित करण्यात येतात. तसेच, २ दिवस हे जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीनुसार सूट देण्यासाठी राखीव ठेवण्यात येतात.

Maharashtra government's big announcement

"These 3 days" during Navratri festival, exemption from loudspeaker use till twelve o'clock in the night

Mumbai: Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis have decided to give an extra day's exemption to the use of loudspeakers in order to celebrate Navratri festival in Maharashtra this year.  Accordingly, on 1st, 3rd and 4th of October, loudspeakers and loudspeakers can be used from 6 am to 12 pm.

 In order to celebrate Navratri festival with enthusiasm this year, on October 1, 2022, the use of loudspeakers and loudspeakers has been exempted from 6 am to 12 pm for Navratri festival.  Therefore, apart from Monday, October 3 and Tuesday, October 4, Saturday, October 1 will be available as an additional day for this year's Navratri festival in Mumbai.

 Under the Environment and Climate Change Department's Noise Pollution (Regulation and Control) Revised Rules, 2017, the concerned Collectors have been authorized to announce exemptions for the use of loudspeakers and loudspeakers from 6 am to 12 pm by fixing a total of 15 days in a year.  Generally, 13 days are fixed by the Collector concerned.  Also, 2 days are reserved for exemption according to local conditions in the district.