जन्मताच हृदयाला छिद्र (ASD-VSD) या हृदयासंबंधी दुर्धर आजाराने ग्रस्त बालकांना जीवनदान!, १ ते १० वयोगटातील बालकांची मुंबईत पार पडणार मोफत हृदय शस्त्रक्रिया Giving life to children suffering from congenital heart defect (ASD-VSD)! Free heart surgery for children aged 1 to 10 in Mumbai

जन्मताच हृदयाला छिद्र (ASD-VSD) या हृदयासंबंधी दुर्धर आजाराने ग्रस्त बालकांना जीवनदान! 

१ ते १० वयोगटातील बालकांची मुंबईत पार पडणार मोफत हृदय शस्त्रक्रिया 

महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागातील चंद्रपूर, अतिदुर्गम आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील पालकांनी बघितली आशेची नवी पहाट. 

जन्मताच हृदयाला छिद्र (ASD-VSD) या हृदयासंबंधी दुर्धर आजाराने अनेक बालके ग्रस्त आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, महागडा उपचार, मोठ्या शहरात राहून उपचार करून घेण्यास येणाऱ्या अडचणी हे ग्रामीण पातळीवरील रुग्ण नातेवाईकांना परवडण्यासारखे नाही. याची माहिती मिळताच  विजय वडेट्टीवार मित्र परिवाराच्या पुढाकारातून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील  १ ते १० या वयोगटातील हृदय संबंधी आजारग्रस्त बालकांची जुपिटर हॉस्पिटल ठाणे (मुंबई) येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात करण्याचा निर्धार आम्ही केला.  
या उपक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले होते. अनेक पालकांनी आपल्या बालकाला पुन्हा जीवनदान मिळावे यासाठी नाव नोंदविले होते. 
महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागातील औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूर तर नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, आदिवासी बहुल जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख असलेल्या भागातील हृदय रोगाशी संबंधित आजाराने ग्रस्त बालकांची आज प्राथमिक तपासणी नागपूर येथे पार पडली.
या बालकांचे पुढील उपचार ठाणे (मुंबई) शहरातील जुपिटर हॉस्पिटल मोठ्या रुग्णालयात मोफत करण्यात येणार असून राबविण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया उपक्रमात आजारग्रस्त रुग्ण व सोबत एक नातेवाईक यांना मुंबई गाठण्यासाठी विमान प्रवास, राहण्याची व्यवस्था, शस्त्रक्रिया व उपचार खर्च, या सर्व सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहे.
यावेळी डॉक्टर सतीश दास (डीन सुपर स्पेशालिस्ट), डॉक्टर देशमुख (मेडिकल कॉलेज डीन), डॉक्टर सुदित गुप्ता व  विजय वडेट्टीवार मित्र परिवारातील सहकारी उपस्थित होते.

Giving life to children suffering from congenital heart defect (ASD-VSD)!

 Free heart surgery for children aged 1 to 10 in Mumbai