चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आंदोलन
चंद्रपुर: देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. यासाठी केंद्र सरकारच्या नाकर्तेपणा कारणीभूत आहे. परंतु, सत्तेची नशा चढल्यागत केंद्र सरकारमधील मंत्री वागत आहेत. त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या ताफ्यासमोर निदर्शने करीत इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला.
शुक्रवारी (ता. २३) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास एन. डी. हॉटेलसमोर सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. इंधन दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. परंतु, केंद्र सरकारच्या वतीने इंधन दरवाढ कमी करण्यासंदर्भात कोणत्याही उपाययोजना केल्या जाताना दिसत नाही. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनात काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
#PetrolDieselPrice