महात्मा गांधी जयंती निमित्ताने राज्य शासनाने सर्व वृत्तपत्रांना दर्शनी जाहिरात द्यावी- प्रदीप कुलकर्णी यांची मागणी
माजलगाव (बीड) - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्य शासनाच्या वतीने सर्व वृत्तपत्रांना दर्शनी जाहिरात देण्याची मागणी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात प्रदीप कुलकर्णी पुढे म्हणतात की राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असा राज्यामध्ये सेवा पंधरवडा सुरू करण्यात आलेला आहे . राष्ट्रनेता माननीय नरेंद्रजी मोदी पंतप्रधान भारत सरकार यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हा पंधरवडा सुरू करण्यात आला असून तो राष्ट्रपिता महात्मा गांधी( 2 आक्टोंबर ) यांच्या जयंती पर्यंत चालणार आहे. शुभारंभ निमित्त माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या वतीने सेवा पंधरवाडा जाहिरात सर्व वृत्तपत्राला दिली होती याच धर्तीवर या सेवा पंधरवड्याच्या समारोपाची जाहिरात महात्मा गांधीच्या जयंतीच्या निमित्ताने शासनमान्य जाहिरात यादीवरील सर्व वृत्तपत्रांना सर्वांना समान धोरण याप्रमाणे किमान 800 चौरस सेंटीमीटर ची देण्यात यावी अशी मागणी संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली आहे.
माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे संघटनेच्या या मागणीची सकारात्मक दखल घेऊन सर्व वृत्तपत्रांना न्याय देतील अशी अपेक्षा शेवटी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
On the occasion of Mahatma Gandhi Jayanti, the state government should give full page advertisement to all the newspapers - Pradeep Kulkarni's demand
Majalgaon (Beed) - Maharashtra President of Association of Small and Medium Newspapers of India, Pradeep Kulkarni, through a statement to Maharashtra Chief Minister Namdar Eknathrao Shinde, has demanded that all newspapers be given face-to-face advertisement on behalf of the state government on the occasion of the birth anniversary of Father of the Nation Mahatma Gandhi. Pradeep Kulkarni further says that a service fortnight has been started in the state from the leader of the nation to the father of the nation. This fortnight has been started on the occasion of the birthday of the national leader Hon'ble Narendraji Prime Minister of India and it will continue till the birth anniversary of the father of the nation Mahatma Gandhi (October 2). On the same lines as the Seva fortnight advertisement was given to all newspapers on the occasion of the inauguration of Hon'ble Narendraji Modi's birthday, on the same lines as the end of this Seva fortnight advertisement on the occasion of Mahatma Gandhi's birth anniversary, all the newspapers on the government approved advertisement list should be given at least 800 square centimeters as per the same policy. President Pradeep Kulkarni has approached Chief Minister Eknathrao Shinde.
Finally, Association of Small and Medium Newspapers of India Maharashtra Pradesh State President Pradeep Kulkarni has expressed the hope that Hon'ble Chief Minister Eknathrao Shinde will take a positive note of this demand of the organization and give justice to all the newspapers.