चंद्रपुर शहर महानगर पालिकाचे Zero पेंडसी अभियान, सेवा पंधरवाड़ा अंतर्गत मनपाचे झिरो पेंडसी अभियान, प्रत्येक झोन मधे सेवा पंधरवाड़ा अभियान अंतर्गत सेवा शिबिर लावले जाणार #Zero-Pendsi-Campaign #Chandrapur-City-Municipal-Corporation #Municipality-Under-Seva-Pandharwada #Seva-Pandharwada-Campaign #Zone.

❇️ चंद्रपुर शहर महानगर पालिकाचे Zero पेंडसी अभियान

❇️ सेवा पंधरवाड़ा अंतर्गत मनपाचे झिरो पेंडसी अभियान

❇️ प्रत्येक झोन मधे सेवा पंधरवाड़ा अभियान अंतर्गत सेवा शिबिर लावले जाणार
   
चंद्रपूर, दि. १७ सप्टेंबर : राज्य शासनाच्या सुचनेनुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत १० सप्टेंबर २०२२ पर्यंत चंद्रपूर महानगरपालिकेच्या विविध विभागांकडे जर नागरिकांचे काही प्रलंबित अर्ज, तक्रारी असतील तर ते  निकाली काढण्याचे निर्देश २० सप्टेंबर रोजी स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत आयुक्तांनी दिले आहेत.
 
यासाठी चंद्रपुर शहर महानगर पालिकाच्या सर्व विभागांनी नियोजन करावे. प्रत्येक झोननिहाय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात यावे, या विशेष शिबिरात शासनाच्या विविध योजना जसे पंतप्रधान स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, एकल खिडकी, विवाह नोंदणी, जन्म - मृत्यु प्रमाणपत्र, मालमत्ता कर, बचतगट कर्ज, दिव्यांग ओळखपत्र, आरोग्य शिबीर, रेन वॉटर हार्वेस्टींग प्रमाणपत्र, नवीन नळ जोडणी इत्यादींशी प्रलंबित प्रकरणांचे निराकरण केले जाणार आहे. तसेच संबंधित विभागाच्या पोर्टलवर प्रलंबित असलेले अर्ज, विविध माध्यमातुन प्राप्त झालेल्या तक्रारी १० सप्टेंबर २०२२ पर्यंत १०० टक्के निकाली काढण्यासाठी सर्वांनी विभागांनी गांभीर्याने काम करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

Zero pendsi campaign of Chandrapur City Municipal Corporation

zero pendsi campaign of municipality under Seva Pandharwada

service camp will be set up under Seva Pandharwada campaign in each zone

Chandrapur, Dt.  September 17: As per the instructions of the state government, 'National Leader to National Father' service fortnight will be celebrated from September 17 to October 2.  Under this, if there are any pending applications and complaints of the citizens with the various departments of Chandrapur Municipal Corporation till September 10, 2022, then the Commissioner has given directions to settle them in the meeting held on September 20 in the Standing Committee Hall.
 
 All departments of Chandrapur City Municipal Corporation should plan for this.  A special camp should be organized zone wise, in this special camp various government schemes like Pradhan Mantri Swanidhi Yojana, Pradhan Mantri Awas Yojana, Ramai Awas Yojana, Single Window, Marriage Registration, Birth - Death Certificate, Property Tax, Savings Group Loan, Disability Identity Card, Health Camp,  Pending cases related to rain water harvesting certificate, connection of new taps etc. are to be resolved.  Also, all the departments have been instructed to work seriously to settle the applications pending on the portal of the concerned department, the complaints received through various channels till 10th September 2022.