प्रथम पारितोषिक – रुपये १ लक्ष, ट्रॉफी तसेच त्या वॉर्डसाठी २५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर ११ ऑक्टोबर - चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन चंद्रपूर शहर " स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा " घेण्यात येणार असल्याची माहीती आयुक्त विपीन पालीवाल यांनी १० ऑक्टोबर रोजी मनपा राणी हिराई सभागृहात आयोजीत सभेत दिली.
१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत " माझ्या शहरासाठी माझे योगदान " या थीमवर ही वार्डस्तरीय स्पर्धा होणार असुन स्पर्धेची रूपरेषा व स्वरूप समजावून सांगण्यासाठी सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी, सामाजीक संस्था यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला.
सदर स्पर्धेत नागरिकांना गट बनवुन सहभागी होता येणार असुन प्रत्येक गटामध्ये कमीत कमी २५ सदस्य असणे आवश्यक आहे. सौंदर्यीकरण करण्यास मनपा मार्फत झाडे व पेंटिंग कलर (मर्यादित) पुरविण्यात येणार असुन इतर काही साहित्याची आवश्यकता असल्यास जसे सुरक्षा साधने इत्यादी मात्र त्या स्पर्धक गटाला स्वतः करावी लागणार आहे. स्पर्धेसाठी गुणांकन पद्धत निश्चित करण्यात आली असुन कामाच्या तासांवर तसेच कामात दररोज किती व्यक्ती सहभागी होतात यावर त्रयस्थ निरीक्षकांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.
स्वयंसेवी संस्था, सामाजीक संस्था, युवक/युवती मंडळे इत्यादी सर्वांना यात सहभागी होता येणार असुन स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्यास काही स्थळ मनपातर्फे देण्यात येणार असुन याव्यतिरिक्त इतर स्थळ जसे शहरातील मुख्य चौक, रस्ता दुभाजक, बगीचा, सार्वजनिक ठिकाणे या जागा निवडण्याची मुभा स्पर्धक गटांना राहणार आहे.
या स्पर्धेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गटांना भरघोस पारितोषिक सुद्धा दिले जाणार आहे.
प्रथम पारितोषिक – १ लक्ष, ट्रॉफी व त्या वार्डासाठी २५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे
द्वितीय पारितोषिक – ७१ हजार,ट्रॉफी व त्या वार्डासाठी १५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे
तृतीय पारितोषिक – ५१ हजार, ट्रॉफी व त्या वार्डासाठी १० लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे
टाकाऊपासुन टिकाऊ बनवा ( Using Waste to Create Best ) – २१ हजार
स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर असुन
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeF1jcqqWbAjg1VLX3hvjt0QZIAd93GUt3-usmi1FSSvZv49g/viewform?usp=sharing
या गुगल लिंकवर माहीती भरुन स्पर्धकांना स्पर्धेत भाग घेता येईल. सदर लिंक मनपाच्या फेसबुक पेजवर सुद्धा उपलब्ध आहे. स्पर्धेत नागरिकांनी आपल्या टीमसह सहभागी होऊन आपल्या शहराच्या सौंदर्यीकरणात योगदान देण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
Chandrapur Municipal Corporation "Cleanliness and Beautification League Competition" 1st Prize – Rs.1 lakh,
trophy and development and beautification works worth Rs.25 lakh for that ward
#Loktantrakiawaaz
Chandrapur October 11 - Commissioner Vipin Paliwal informed in a meeting held at Municipal Rani Hirai Auditorium on October 10 that Chandrapur Municipal Corporation will conduct "Cleanliness and Beautification League Competition" under Swachh Bharat Abhiyan with public participation.
This ward level competition will be held from 1st November to 30th November 2022 on the theme "My contribution to my city" and the meeting was organized to explain the outline and format of the competition. On this occasion, people's representatives, voluntary organizations and social organizations showed a large participation.
Citizens can participate in this competition by forming groups and each group must have at least 25 members. For beautification, trees and painting color (limited) will be provided through Municipal Corporation and if any other materials are required like safety devices etc., the competing group will have to do it themselves. A scoring system has been fixed for the competition and the hours of work as well as the number of persons participating in the work per day will be monitored by third party observers.
Voluntary organizations, social organizations, youth/youth groups etc. will be able to participate in this and some places will be given by the Municipal Corporation for cleaning and beautification and in addition, other places like the main square of the city, road bifurcation, garden, public places will be allowed to be chosen by the competing groups. .
A huge prize will also be given to the groups that perform excellently in this competition.
First Prize – 1 lakh, trophy and development and beautification works worth Rs. 25 lakh for that ward
Second prize – 71 thousand, trophy and development and beautification works of 15 lakh rupees for that ward
Third prize – 51 thousand, trophy and development and beautification works worth Rs. 10 lakh for that ward
Using Waste to Create Best – 21 thousand
The last date to participate in the competition is 20th October