धम्‍मचक्र अनुप्रवर्तन महोत्‍सवानिमित्त सुमधुर बुध्‍द भीमगीतांची मेजवानी, सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार, सुप्रसिध्‍द गायक आनंद शिंदे आणि पार्श्‍वगायिका वैशाली माडे यांची उपस्थिती A feast of melodious Buddha Bhimgita on the occasion of Dhammachakra Anupravarthan Festival, initiated by Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar, with the presence of famous singer Anand Shinde and playback singer Vaishali Made.

धम्‍मचक्र अनुप्रवर्तन महोत्‍सवानिमित्त सुमधुर बुध्‍द भीमगीतांची मेजवानी

◆ सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

◆ सुप्रसिध्‍द गायक आनंद शिंदे आणि पार्श्‍वगायिका वैशाली माडे यांची उपस्थिती

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 15 ऑक्टोबर : 66 व्‍या धम्‍मचक्र अनुप्रवर्तन महोत्‍सवानिमित्त सांस्‍कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने दीक्षाभूमी चंद्रपूर येथे 16 ऑक्‍टोबर रोजी सायं. 7 वाजता सुप्रसिध्‍द गायक आनंद शिंदे व पार्श्‍वगायिका वैशाली माडे यांच्‍या बुध्‍द भीमगीतांच्‍या सुमधूर कार्यक्रमाचे भव्‍य आयोजन करण्‍यात आले आहे.
सांस्‍कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांस्‍कृतिक कार्य संचालनालयाच्‍या माध्‍यमातून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आनंद शिंदे हे विख्‍यात गायक असून लोकगीतांच्‍या क्षेत्रात त्‍यांनी आपल्‍या गायकीचा ठसा उमटविला आहे. पार्श्‍वगायिका वैशाली माडे या हिंदी व मराठी चित्रसंगीतातील आघाडीच्‍या गायिका आहे. मराठी व हिंदी सारेगमप या कार्यक्रमाच्‍या त्‍या विजेत्‍या ठरल्‍या आहेत. 

बुध्‍द भीमगीतांच्‍या या सुमधुर कार्यक्रमाला नागरिकांनी मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन सांस्‍कृतिक कार्य संचालनालयाद्वारे करण्‍यात आले आहे.

A feast of melodious Buddha Bhimgita on the occasion of Dhammachakra Anupravartana festival

 ◆ Initiative of Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar

 ◆ Presence of famous singer Anand Shinde and playback singer Vaishali Made

 #Loktantrakiawaaz
 Chandrapur, Dt.  October 15: On the occasion of the 66th Dhammachakra Anupravarthan Festival, on the initiative of Minister for Cultural Affairs and Guardian Minister of Chandrapur District, Sudhir Mungantiwar, Deekshabhumi was held at Chandrapur on October 16 in the evening.  At 7 o'clock a melodious program of Budh Bhim Geet by famous singer Anand Shinde and playback singer Vaishali Made has been organized.

 Minister of Cultural Affairs Shri.  Mungantiwar organized the program through the Directorate of Cultural Affairs.  Anand Shinde is a famous singer and he has made his mark in the field of folk songs.  Playback singer Vaishali Made is a leading singer in Hindi and Marathi film music.  They have become the winners of the program Marathi and Hindi Saregamp.

 Directorate of Cultural Affairs has appealed to citizens to attend this melodious program of Buddha Bhim Geet in large numbers.