कुष्ठरोग मोहिमेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आरोग्य अधिकारी कर्मचारी सन्मानित Health Officer Staff honored for outstanding work in leprosy campaign

कुष्ठरोग मोहिमेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आरोग्य अधिकारी कर्मचारी सन्मानित

चंद्रपूर 20 ऑक्टोबर - संयुक्त  कुठरुग्ण अभियान, सक्रिय कुष्ठरुग्ण शोध मोहीम 2022-2023 अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मनपा आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांचा 17 ऑक्टोबर रोजी मनपा स्थायी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
सह संचालक आरोग्य सेवा ( कुष्ठरोग) चंद्रपूर, डॉ. संदीप गेडाम व मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री वाडे, डॉ.विजया खेरा, डॉ.प्राची खैरे, स्टाफ नर्स रेश्मा शेख, पिंकी बावणे, एएनएम वनिता नागापुरे, आशा वर्कर शुभांगी बाडगुरे, सोनाली गेडाम, वर्षा धोबे, प्रेमलता रहांगडाले, संजीवनी केरवटकर, सपना शेंडे, सुनीता भगत, दामिनी उराडे, गिता वाळके, शिल्पा पुडके, नंदा माकडे, मनीषा पिपरे, कविता मोहरकर, नैना डोहाने, मल्टीपर्पज वर्कर नारायण मोरे यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत एकुण ६९ टीमद्वारे मनपा क्षेत्रातील सातही प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रातील अति जोखीमग्रस्त भागातील २३,९९८ घरांतील १,०३,८२९ नागरीकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. १३८ टीम सदस्यांद्वारे त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील लोकांची गृहभेटीद्वारे तपासणी करण्यात येऊन समाजातील निदर्शनास न आलेले प्राथमिक अवस्थेतील कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण या आजाराचे रुग्ण शोधून औषधोपचार मिळवून देण्यास मदत करण्यात आली. सदर कार्य यशस्वीरीत्या पुर्ण केल्याबद्दल आयुक्त विपीन पालीवाल यांनी आरोग्य विभागाचे अभिनंदन केले.
याप्रसंगी डॉ. नयना उत्तरवार, डॉ.अश्विनी भारत, डॉ. अर्वा लाहिरी, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधु, डॉ. अतुल चटकी व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.

Health Officer Staff honored for outstanding work in leprosy campaign

 Chandrapur October 20 - Municipal Health Officers were felicitated for their excellent work under Joint Leprosy Campaign, Active Leprosy Search Campaign 2022-2023 in a program held at Municipal Municipal Permanent Auditorium on October 17.

Joint Director Health Services (Leprosy) Chandrapur, Dr.  Sandeep Gedam and Municipal Medical Health Officer Dr.  Dr. Vanita Gargelwar Medical Officer.  Jayashree Wade Dr. Vijaya Khera, Dr. Prachi Khaire, Staff Nurse Reshma Sheikh, Pinky Bavane, ANM Vanita Nagapure, Asha Worker Shubhangi Badgure, Sonali Gedam, Varsha Dhobe, Premlata Rahangdale, Sanjeevani Kerwatkar, Sapna Shende, Sunita Bhagat, Damini Urade,  Geeta Valke, Shilpa Pudke, Nanda Makde, Manisha Pipere, Kavita Mohrkar, Naina Dohane, Multipurpose Worker Narayan More were honored with certificates.
 A survey of 1,03,829 citizens of 23,998 households in high-risk areas of all seven primary health centers in the Municipal Health Department was conducted by a total of 69 teams.  138 team members conducted home visits to the people in their assigned area of ​​work and helped to find the undiagnosed primary stage leprosy and tuberculosis patients in the society and help them get treatment.  Commissioner Vipin Paliwal congratulated the health department for successfully completing the work.
 On this occasion Dr.  Naina Uttarwar, Dr. Ashwini Bharat, Dr.  Dr. Arva Lahiri, City Program Manager.  Narendra Janbandhu, Dr.  Atul Chatki and the officials and staff of the health department were present.