जमिनीच्या मोजणीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करा-जिल्हाधिकारी विनय गौडा, चंद्रपुर जिल्ह्याकरीता 15 रोव्हर मशीन घेण्यास मान्यता, मोजणी प्रकरणांची प्रलंबितता निकाली काढावी Use latest technology for land enumeration-District Magistrate Vinay Gowda, Chandrapur district approves purchase of 15 rover machines, to clear pendency of enumeration cases


🔹जमिनीच्या मोजणीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करा-जिल्हाधिकारी विनय गौडा

🔹चंद्रपुर जिल्ह्याकरीता 15 रोव्हर मशीन घेण्यास मान्यता

🔹मोजणी प्रकरणांची प्रलंबितता निकाली काढावी

चंद्रपूर दि. 10 : रोव्हर मशीनसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जमिनीची मोजणी करून भूमि अभिलेख विभागाने मोजणी प्रकरणांची प्रलंबितता निकाली काढावी व नागरिकांना तत्परतेने सेवा द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी गुरवारी दिले.
जमीन मोजणीसाठी अर्ज केलेल्या मौजा वेंडली येथील गोपीचंद रघुनाथ नागापुरे यांच्याकडे जिल्हाधिकारी यांनी आज भेट दिली. याप्रसंगी भूमि अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रमोद घाडगे यांनी प्लेनटेबल, ईटीएस मशीन व रोव्हर मशीनद्वारे मोजणी कामाचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी यांना करून दाखविले.
रोव्हर मशीनने मोजणी काम अत्यंत कमी वेळात केले जाते. त्यामुळे जिल्हा नियोजन व विकास निधीतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्याकरीता 15 रोव्हर मशीन व इतर साहित्य घेणेस मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यावेळी भूमि अभिलेख कार्यालयाचे उप अधीक्षक मिलिंद राऊत, भुकरमापक बोधीत्व रामटेके, अश्विन जामीनकर, मनोज भांदककर उपस्थित होते.

🔹Use latest technology for land measurement-District Magistrate Vinay Gowda

 🔹 Approval to buy 15 rover machines for Chandrapur district

 🔹 Pending of counting cases should be settled

 Chandrapur Dt.  10: District Collector Vinay Gowda G.C directed that the Land Records Department should settle the pending cases of enumeration by measuring the land with the help of latest technology like rover machine and provide prompt service to the citizens.

 Collector today visited Gopichand Raghunath Nagapure of Mauja Vendli who applied for land survey.  On this occasion, the District Superintendent of Land Records Department, Pramod Ghadge, demonstrated to the Collector the counting work using plain table, ETS machine and rover machine.

 Counting work is done in very less time with rover machine.  Therefore, approval has been given to purchase 15 rover machines and other materials for the district under the innovative scheme from the District Planning and Development Fund.  Deputy Superintendent of Land Records Office Milind Raut, land surveyor Bodhitwa Ramteke, Ashwin Jaminkar, Manoj Bhandakkar were present on this occasion.