प्रलंबित पीक नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करावी- जिल्हाधिकारी विनय गौडा, वरोरा व भद्रावती तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा Pending crop loss amount should be paid to farmers immediately- Collector Vinay Gowda, Varora and Bhadravati taluka level system review

✳️ प्रलंबित पीक नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करावी- जिल्हाधिकारी विनय गौडा

✳️ वरोरा व भद्रावती तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा

चंद्रपूर, दि. 10 : पीक नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने गावागावात दवंडी द्यावी. तसेच विशेष शिबीर आयोजित करून प्रलंबित प्रकरणातील शेतकऱ्यांकडून त्यांचे खाते क्रमांक प्राप्त करून त्यांना रकम अदा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी  विनय गौडा जी.सी यांनी गुरवारी दिल्या. 

वरोरा व भद्रावती येथील तालुकास्तरीय यंत्रणांची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. गौडा यांच्या अध्यक्षतेखाली वरोरा उपविभागीय कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार रोशन मकवाने व इतर अधिकारी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी यांनी पी. एम. किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे प्रलंबित इ-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे सांगून शासनाच्या 13 विविध महत्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. 
वरोरा भद्रावती नगरपालिका यांचे विकासकामांचा आढावा घेतांना तेथील मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली तसेच घनकचरा व्यवस्थापनाची माहिती घेण्यात आली.  नगरपालिकांनी उत्कृष्ट कामातून राज्यामध्ये पहिल्या तीन क्रमांकामध्ये येण्यासाठी प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

🔹वनराई बंधारा बांधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे श्रमदान

वरोरा तालुक्यातील मौजे कळमगव्हाण येथे कृषी विभाग व गट ग्रामपंचायत कळमगव्हाण - तुळाणा यांचे पुढाकारातून लोकसहभाग व श्रमदानातून कोराडी नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला. यात जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी देखील श्रमदान केले. 
याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, तहसीलदार रोशन मकवाने, नायब तहसीलदार मधुकर काळे, तालुका कृषी अधिकारी गजानन भोयर, सरपंच मनिषा ढेंगळे, ग्रामपंचायत सदस्य राजीव आसेकर, समर्थ बोढे, पोलीस पाटील देवराव महाकुलकर, बंडू ढेंगळे, दीपक ताणले, ईश्वर आत्राम, रामभाऊ मेले, नितेश महाकुलकर, विजय मिलमिले, विजय बावणे, विजय देहारकर, नितीन बोढे व इतर ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधण्यासाठी श्रमदान केले.

Pending crop loss amount should be paid to farmers immediately- Collector Vinay Gowda

Warora and Bhadravati taluka level system review
Chandrapur, Dt.  10: The taluk level system should make a village-to-village rush to pay the amount of crop damage to the farmers immediately.  Also Collector Vinay Gowda GC gave instructions to organize a special camp and get their account numbers from the farmers in pending cases and pay them the amount.

 A review meeting of taluka level systems in Varora and Bhadravati Collector Shri.  Warora Sub-Divisional Office was taken under the chairmanship of Gowda.  He was talking at that time.  Sub Divisional Officer Subhash Shinde, Tehsildar Roshan Makwane and other officials were present on this occasion.

 Collector P.  M.  He asked to complete the pending e-KYC of the beneficiaries under Kisan Yojana immediately and gave instructions to effectively implement 13 different ambitious schemes of the government.
 While reviewing the development works of Varora Bhadravati Municipality, information was taken about property tax and water tax collection as well as solid waste management.  Municipalities should strive to be among the top three in the state through excellent work, he added.

 🔹 Labor donation of District Collectors to build forest dam
 At Mauje Kalmagvan in Varora taluka, a forest dam was constructed on the Koradi canal through the initiative of the Agriculture Department and Group Gram Panchayat Kalamagvan - Tulana through public participation and labor donation.  Collector Vinay Gowda also contributed.

 On this occasion District Superintendent Agriculture Officer Bhausaheb Barhate, Sub Divisional Officer Subhash Shinde, Sub Divisional Agriculture Officer Chandrakant Thackeray, Tehsildar Roshan Makwane, Naib Tehsildar Madhukar Kale, Taluka Agriculture Officer Gajanan Bhoyer, Sarpanch Manisha Dhengale, Gram Panchayat Member Rajeev Asekar, Samarth Bodhe, Police Patil Devrao Mahakulkar  , Bandu Dhengle, Deepak Thanle, Ishwar Atram, Rambhau Mele, Nitesh Mahakulkar, Vijay Milmile, Vijay Bavane, Vijay Deharkar, Nitin Bodhe and other villagers donated labor to build Vanrai Dam.