चंद्रपुरात २८ डिसेंबरपासून सुरुवात
१ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांची मेजवानी
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर : लॉयन्स ऑफ चंद्रपूर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा लॉयन्स एक्स्पो २०२२ मेला आयोजित करण्यात येत आहे. चांदा क्लब मैदानावर होणाऱ्या या मेंळयाचे २९ डिसेंबरला उद्घाटन होणार आहे. तब्बल पाच दिवस चालणाऱ्या आनंदाच्या या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
२९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता स्वच्छ भारत या विषयावर रांगोळी स्पर्धा, ६ वाजता टाकाऊपासून टिकाऊ यावर आधारित क्रिएटिव्ह क्रॉफ्ट स्पर्धा, ७ वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा, रात्री ९ वाजता फॅमिली फॅशन शो होणार आहे. ३० डिसेंबरला ४.३० वाजता लॉयन्स परिवारासाठी अनुष्ठान, ३१ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता हॅण्ड पेन्टिंग, ६ वाजता हस्ताक्षर स्पर्धा, ७ वाजता ग्रुप डॉन्स स्पर्धा होतील. त्यानंतर रात्री ९ वाजता न्यू इअर सेलिब्रेशन होणार आहे.
१ जानेवारीला ५ वाजता पुष्प सजावट, ६ वाजता स्वरचित कहानी, ७ वाजता वक्तृत्व स्पर्धा, ८ वाजता युगल नृत्य स्पर्धा होतील. २ जानेवारीला ५ वाजता व्यंजन स्पर्धा, ६ वाजता निरोगी केस स्पर्धा, ६.३० वाजता सेल युअर प्रोडक्ट, ८ वाजता गायन स्पर्धा, ९ वाजता मेगा तंबोला स्पर्धा होतील. या सर्व स्पर्धाना प्रवेश शुल्क आहे. त्यानंतर स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत केले जाणार आहे.
आरोग्यविषयक जनजागृती
लॉयन्स क्लबच्या वतीने मेला कालावधीत तब्बल पाच दिवस एचआयव्ही/ एड्स आणि सिकलसेल या आजारावर जनजागृती केली जाणार आहे. यावेळी राज्य शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
Lions Expo 2022 Mela,
Chandrapur starting from 28th December