पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे बंधु हितेंद्र अहीर यांचे दुःखद निधन, उद्या सकाळी 10 वाजता अंत्यविधी Former Union Minister of State for Home Hansraj Ahir's brother Hitendra Ahir passes away, funeral tomorrow at 10 am

पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे बंधु हितेंद्र अहीर यांचे दुःखद निधन

उद्या सकाळी 10 वाजता अंत्यविधी

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर / यवतमाळ :- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर व हरिश्चंद्र अहीर यांचे धाकटे बंधू हितेंद्र गंगाराम अहीर यांचे दि. 12 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात वयाच्या 51 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, हर्षवर्धन व आदित्यवर्धन ही दोन मुले, भाऊ-बहीणी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

दि. 13 जानेवारी, 2023 रोजी बिनबा गेट परिसरातील शांतीधाम येथे त्यांच्या पार्थिवावर सकाळी 10 वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे.

Former Union Minister of State for Home Hansraj Ahir's brother Hitendra Ahir passes away, 

funeral tomorrow at 10 am