चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे प्रजासत्ताक दिनाचा ७४ वा वर्धापन दिन साजरा 74th anniversary of Republic Day celebrated by Chandrapur Municipal Corporation

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे प्रजासत्ताक दिनाचा ७४ वा वर्धापन दिन साजरा

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर २६ जानेवारी - चंद्रपुर शहर महानगरपालिकेच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७:५० वाजता महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

सकाळी ७.४० वाजता महानगरपालिका कार्यालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण  केल्यावर सकाळी ७.५० वाजता महानगरपालिका कार्यालयाच्या इमारतीवर आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते राष्ट्रध्वजास ध्वजारोहण व मानवंदना देण्यात आली. यावेळी आयुक्त यांनी सर्व विभागाचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरु असुन गतिमान प्रशासनासाठी नियोजनबद्ध कार्य करण्याच्या सुचना दिल्या.
याप्रसंगी उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई, सहायक आयुक्त विद्या पाटील, सचिन माकोडे, राहुल पंचबुद्धे, नरेंद्र बोभाटे, उपअभियंता विजय बोरीकर, अनिल घुमडे, संजय जोगी, विधी अधिकारी अनिल घुले, माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच मनपा अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स चंद्रपूर, प्रभाग कार्यालय क्रमांक - २ कस्तुरबा भवन सात मजली इमारत गांधी चौक,प्रभाग कार्यालय क्रमांक - ३ देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा, बंगाली कॅम्प येथे सहायक आयुक्तांच्या हस्ते तसेच जटपुरा गेट समोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास आयुक्त यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. सकाळी ८.२५ वाजता हुतात्मा स्मारक वाचनालय सिविल लाइन्स येथे उपायुक्त अशोक गराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण व मानवंदना कार्यक्रम घेण्यात आला.

74th anniversary of Republic Day celebrated by Chandrapur Municipal Corporation