भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगात प्रकाश नड्डा जी यांची हंसराज अहीर यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट.... अहीर कुटुंबियांनी केला सन्मान..! BJP National President Jagat Prakash Nadda ji's goodwill visit to Hansraj Ahir's residence.... Ahir family honored..!

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगात प्रकाश नड्डा जी यांची हंसराज अहीर यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट....

अहीर कुटुंबियांनी केला सन्मान..!

चंद्रपुर: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान जगत प्रकाश नड्डा जी यांनी चंद्रपूर येथील विजय संकल्प सभा आटोपल्या नंतर राष्ट्रीय मागासर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट दिली.
मान राष्ट्रीय अध्यक्षांचे आगमन होताच अहीर परिवाराद्वारे कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांचे  स्वागत केले.  यावेळी परिवारातील सदस्यांशी संवाद  साधला. निवासस्थानी आगमन झाल्यानंतर हंसराज अहीर यांनी त्यांना गणेशजींची मूर्ती प्रदान करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. याप्रसंगी भाजपाचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाशजी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, खा रामदासजी तडस, खा अशोक नेते, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी हंसराज अहीर यांनी सदिच्छा भेट दिल्याबद्दल माननीय नड्डाजींप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 

BJP National President Jagat Prakash Nadda ji's goodwill visit to Hansraj Ahir's residence.... 

Ahir family honored..!