अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? Finally Governor Bhagat Singh Koshyari's resignation is accepted, who is the new Governor of Maharashtra?

अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण?

#Loktantrakiawaaz
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार काढणं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच भोवलं आहे. या विधानावरून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला होता. कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा (Resignation) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यापाल आहेत. 
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आज एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे.

Finally Governor Bhagat Singh Koshyari's resignation is accepted,

who is the new Governor of Maharashtra?